Nagpanchami festival : हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री शेषनागाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन – NNL

हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| श्रावण शुक्ल ५ दि ०९ ऑगस्ट रोजी आलेल्या नागपंचमी दिनी हिमायतनगर शहरातील जाधव यांच्या शेतात उभी असलेल्या ६ फुटाच्या शेषनागाच्या मूर्तीच दर्शन घेण्यासाठी शहरातील महिला पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. पांढराध्वज, लाह्या फुटाणे, नारळ आणि पेढ्याच्या प्रसाद अर्पण करून  अनेकांनी नागदेवतांचे दर्शन घेऊन मनोकामना केली.

हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण – उत्सव श्रावण महिन्यात येतात. यंदा श्रावण मासातील पहिल्या सण कोरडा म्हणजे पाऊस नसताना साजरा होताना पाहावयास मिळाला आहे. नागपंचमी उत्सवापासून हिंदू सणांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे आज नागपंचमीच्या औचित्य साधून शहरातील महैला मंडळी पुरुष व चिमुकल्या बालकांनी येथील शेषनागाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर सायंकाळी अनेकांनी आपल्या भावाचे डोळे धूउन लाह्या फुटण्याचा प्रसाद देऊन उत्सव साजरा केला.

शहरातील शेषनागाची मूर्ती हि ६ फुटाची असून, गेल्या अनेक वर्षांपासून ऊंन सावलीत बोरीचे आणि लिंबाच्या झाडाखाली उभी आहे. पूर्वीच्या काळी जेंव्हा या भागात विष्णू शिवाची आराधना करत होते. त्यावेळी त्यांना ऊन आणि पाण्यापासून वाचविण्यासाठी शेषनागाचे रूप धारण केले होते. येथील मूर्ती तश्याच अवतरातील असून, या मूर्तीला बाजूला करून मंदिराचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला मात्र अचानक मूर्ती खाली पडली. त्यावेळी अनेकांनी मूर्तीला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र मूर्ती उचलता आली नाही. जेंव्हा मंदिर बांधकामाचा विषय रद्द केला. तेंव्हा सर्व शेतकऱ्यांना मूर्ती उभी करून ठेवता आली असे जुने जाणकार सांगतात.

 

तेंव्हापासून मंदिराच्या बांधकामाचा विषय बाजूला ठेवण्यात आला आहे. या मूर्तीला पांढरा ध्वज चढवून  अभिषेक पूजा केली जाते अनेकजण आपल्या इच्छाशक्तीप्रामणे दुध, पंचामृत आणि साध्या पद्धतीने पूजा करून मनोकामना करतात. आज याच नागपंचमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो महिला पुरुष नागरिकांनी शेषनागाचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. तर ग्रामीण भागातील बालगोपाल आणि महिला मंडळींनी झोका खेळून नागपंचमी सणाचा आनंद लुटला असल्याचे पाहावयास मिळाले आहे तर काही लोक याच दिवशी जुगार खेळून नागपंचमीला हि कुप्रथा चालवित असल्याने महिला मण्डळी नाराजी व्यक्त करताना देखील दिसून आली आहे.  

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button