नांदेड

Damage to agriculture due to cloudburst-like rain | ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान – NNL

किनवट/ परमेश्वर पेशवे| किनवट माहुर तालुक्यातील अनेक भागात दिनांक 15 जुलै च्या मध्यरात्री झालेल्या उसळधार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांची महसूल प्रशासनाकडे केली आहे.

दिनांक 15 जुलै च्या मध्यरात्री किनवट माहुर तालुक्यातील जलधरा, इस्लापूर, शिवणी, बोधडी, गोकुंदा सारखाणी उमरी बाजार मांडवी वाई, वानोळा वरचे मारेगाव, खालचे मारेगाव,तसेच आप्पारापेठ, आमलापूर कंचेली, पांगरपहाड, तोटंबा, मलकजाम, मलकजाम तांडा,दयाळ धानोरा, गोंडजेवली, तल्हारी, तल्हारी तांडा, झळकवाडी, कुपटी, भिशी, मुरझळा, कोल्हारी,सोनपेठ, सोनवाडी, लोखंडवाडी, करंजी हुंडी कोसमेट, पांगरी, परोटी, नंदगाव, नंदगाव तांडा, इरेगाव, रिठा भंडारवाडी, पिपरी, डोंगरगाव, कोपरा, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच बरोबर नदीकाठीच्या जमिनीची या आज स्थितीत पाण्याखाली आहेत. या नुकसानी मध्ये बहुतांश शेतकऱ्यांची पिके खरडून गेली तर काही पिके पाण्याखाली आली आहेत तर काही शेतीना तळ्याचे स्वरूप निर्माण झाले.

IMG 20240716 WA0016 1 Damage to agriculture due to cloudburst-like rain | ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान - NNL

मृग नक्षत्र लागल्यापासून पिकायोग्य पाऊस पडल्याने चोहीकडे चांगली पिके डोलताना पाहावयास मिळत होती पण दिनांक 15 जुलै च्या रात्री मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह परिसरात थैमान घातल्याने प्रचंड प्रमाणात शेती व पिकाच्या नुकसानीचा सामना बळीराजांना करावा लागला. त्यातच कोरडवाहू शेतीवर सोयाबीन कापूस पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका या पावसामध्ये बसला.

सदरील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाच्या वतीने तात्काळ करण्यात यावे व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशा स्वरूपाची मागणी आता माजी आमदार प्रदीप नाईक यांनी तहसीलदार शारदा चौडेकर यांच्याकडे केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!