Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

हिमायतनगर, अनिल मादसवार | महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल दोन ते अडीच तास रांगेत उभे राहावे लागले.

oplus_0
oplus_0

महादेवाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना हिमायतनगर बजरंग दलाच्या वतीने दुधाचे वितरण करण्यात आले. तसेच बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मार्कंडेय बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँकेच्या वतीने साबुदाणा फराळाचे वाटप करण्यात आले. विश्वकर्मा सुतार कारागीर संघटनेतर्फे केळी व पेयजलाचे वितरण करण्यात आले, तर शालेय विद्यार्थ्यांनी भाविकांना नायलॉन साबुदाणा पाकिटांचे वाटप केले.

oplus_0

या उपवास प्रसाद व दूध वाटपाचा शुभारंभ श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सेक्रेटरी अनंता देवकते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिला-पुरुष भाविक, भक्तगण तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

oplus_0

“हर हर महादेव… परमेश्वर भगवान की जय!” च्या गगनभेदी घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला. नवसाला पावणाऱ्या श्री परमेश्वराचे दर्शन घेत भाविकांनी पारण्याचा उपवास पूर्ण केला.

महाशिवरात्रीच्या पवित्र मध्यरात्री शासकीय अभिषेक सोहळा संपन्न 

oplus_0

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर श्री परमेश्वर मंदिरात भक्तिभावाने अभिषेक पूजा संपन्न झाली. मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी सहपरिवार श्रींचा अभिषेक करून पूजा अर्चा केली. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या सुमधुर मंत्रोच्चारात हा पवित्र सोहळा पार पडला. मध्यरात्रीच्या या मंगल क्षणी मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button