Citizen Action ; नागरिक कृती समितीने नागरी सुविधांसाठी नांदेड मनपा आयुक्तांना दिले धरणे आंदोलनाचे निवेदन

नांदेड। नांदेड महापालिका आयुक्तांना प्रभाग क्रमांक ४ च्या नागरिक कृती समितीने नागरी सुविधा पुरविण्यासंदर्भात वारंवार निवेदन दिली आहेत. परंतु आज पर्यंत समस्या सोडविण्यात आल्या नाहीत .म्हणून त्या समस्या दिनांक १० मे पर्यंत सोडविण्यास सुरुवात करावी अन्यथा दिनांक १५ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नाल्या, ड्रेस लाईन ,रस्ते ,पाणीपुरवठा व वसंतराव नाईक उद्यानाच्या समस्या संदर्भात नागरिक कृती समितीने दिनांक ०१ एप्रिल २०२३ , दिनांक ०९ ऑगस्ट २०२३, दिनांक १४ ऑगस्ट २०२४ असे वारंवार निवेदने नांदेड मनपा आयुक्तांना दिली आहेत . पौर्णिमा नगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी ,अशोक नगर , नाईक नगर , सुंदर नगर, गीता नगर , इन्कम टॅक्स कॉलनी, हनुमान गड , या आनंद नगर भागातील रोड, ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा व्यवस्थित नाही , तर वसंतराव नाईक उद्यानाच्या गेटला लॉक नसल्यामुळे रात्रीला दारुड्यांच्या पार्ट्या चालतात.

लाखो रुपये खर्च केलेले लॉन व फुल झाडे वाळून गेली आहेत. पेव्हर्स बसवणाऱ्या गुत्तेदाराने सर्वत्र फरश्यांच्या तुकड्यांचे व कचऱ्यांचे साम्राज्य पसरविले आहे. रात्री उशिरा रात्री मुलं क्रिकेट खेळतात व रहिवाशांना त्रास देत असतात . आनंदनगर ते शोभानगर रोडवर चौकापासून काँक्रीटचा रोड करायचे सोडून दिले 100 मीटर पेक्षा अधिक गॅप देऊन काँक्रीटचे काम केले आहे. असे का ? असे अनेक प्रश्न नागरिकांपुढे निर्माण होत आहेत.

त्यामुळे उपरोक्त समस्या सोडविणे मनपाचे आद्य कर्तव्य ठरते. या मागण्या संदर्भात मनपाचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष सोपानराव मारकवाड, सुभाषराव मंगनाळे ,संपादक दीपक कसबे, प्रा .डॉ. शिवदास हमंद ,पंकज कांबळे ,शेख युसुफ शेख इब्राहिम आदींचा समावेश होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button