Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL
नांदेड महाराष्ट्र September 17, 2024

Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतीस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचा गौरवशाली इतिहासाला यावेळी त्यांनी उजाळा दिला. स्वातंत्र्य सैनिकांचा लढाऊ बाणा आमच्यासाठी प्रेरणादायी असून नांदेडसह मराठवाड्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज सकाळी बरोबर 8.40 मिनिटानी मराठवाडा मुक्तिदिन समारंभात  माता गुजरीजी विसावा उद्यान  येथे  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, रेल्वेच्या विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींची उपस्थिती होती.

 अतिवृष्टी नुकसानासाठी लवकरच मदत
यावेळी पालकमंत्र्यांनी  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या परिस्थितीत प्रशासनाच्यावतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानाची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 शासनाकडून आतापर्यंत भरीव मदत
राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी कधीही वेळ लावला नाही. समस्या, आपत्ती, संकट कोणतेही असू दे. तातडीची मदत आणि मानवी संवेदना जोपासून सहाय्य केले आहे.  तसेच सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 446 कोटी रुपये वाटप यापूर्वी करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.         

विविध योजनांतून महिला सक्षमीकरण
महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सध्या संपूर्ण भारतात चर्चेत आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात दीड कोटींवर महिलांना लाभ मिळाला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 8 लक्ष महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पहिल्या दोन महिन्यांचा 3 हजाराचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून आर्थिक स्वावलंबनाचा मोठा इतिहास महाराष्ट्राने रचला आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसोबतच काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या असून यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. युवक युवतींना 6 हजार ते 10 हजार रुपये महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणासोबतच मानधन दिले जाणार आहे. युवकांना या माध्यमातून अनेक आस्थापनांवर काम करायचा अनुभव मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या डोळ्यात स्वयंपाकाचा धूर जाणार नाही अशी घोषणा 2014 मध्ये केली होती. त्याअंतर्गत घराघरात  उज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर दिले जात आहेत. आता महाराष्ट्र शासनाने आणखी यामध्ये भर घातली आहे. महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. मुलगी शिकली की घर शिक्षित होते. मात्र मुलींच्या शिक्षणाला कोणताच अडथळा राहू नये यासाठी उच्च शिक्षणामध्ये मुलींची संख्या वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. मोफत उच्च शिक्षणाची संधी देणारी मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजनेने सध्या अनेक मुलींना उच्च शिक्षणाची दारे उघडली आहेत. सर्व समाजातील गरीब मुलींना याचा फायदा होणार आहे. एसटीमध्ये 50 टक्के मोफत प्रवास आमच्या भगीणींसाठी सुरू केला.

 मोफत वीज योजना क्रांतीकारक
शेतकऱ्यांना सिंचनाचा राजमार्ग दाखविणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी ठरत आहे. 7.5 एचपीच्या कृषी पंपांना मोफत वीज यामार्फत दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयामध्ये आवश्यक असणाऱ्या सहाय्यभूत आरोग्यदायी वस्तूंच्या खरेदीसाठी असणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना, तसेच महाराष्ट्रासह देशभरातील तीर्थ क्षेत्राला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आयुष्याचा कायापालट करण्याचा प्रयत्नम राज्य शासनामार्फत केला जात आहे. आरोग्यासाठी आता महात्मा जोतिबा फुले योजनेतून गरीबांना सर्व प्रकारच्या मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

 जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना गती
गेल्यावर्षीच्या संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पासाठी 7 हजार 655 कोटी किंमतीच्या सुधारित प्रशासकिय प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्प, जिल्हयातील उनकेश्वर येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्प, मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासंदर्भात शासन सकारात्मक असून जुन्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेवून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 

मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे. जिल्ह्यातील मराठा युवकांनी या प्रकरणी संयम बाळगावा असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करतांना प्रत्येक ग्रामपंचायतला हक्काची इमारत देण्याचा संकल्प असून नांदेड जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून आता ग्रामपंचायत इमारतीचे कामे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यात यापूर्वी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत तांडा विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 एकात्मिक ग्राम विकास हेच सूत्र
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राचा व यात्रास्थळांचा विकास करण्याचा प्रयत्न असून यामध्ये पर्यटनमंत्री म्हणून जिल्ह्यातील माहूरगड, नांदेड येथील गुरूद्वारा व अन्य तीर्थ व पर्यटन स्थळांच्या विकासालाही गती दिली जाईल. यासोबतच महिला सक्षमीकरणावर आमचा भर आहे. त्यामुळे महिला बचतगटांचे बळकटीकरण केले जाईल. बचतगटांचे भाग भांडवल प्रत्येकी 15 हजार रुपयांवरून 30 हजार रुपये करण्यात आले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील महिला बचतगटांना नक्कीच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री आवास योजनेतूनही विविध गटातील कुटुंबांना हक्काचे घर दिले जाणार आहे. आवास योजनेतून ओबीसी बांधव सुटले होते त्यांच्यासाठी या शासनाने मोदी आवास योजना सुरू केली. सर्व घटकांसोबतच आता ओबीसींसाठी मोदी आवास योजनेतून घरांची सुविधा दिली जात आहे. ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाचे जाळे असते. राज्यात 40 हजार किलोमीटरचे जाळे ग्रामविकास विभागामार्फत तयार होत आहे. जिल्ह्यालाही या योजनेचा भरघोस लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. 

राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूचा सन्मान
नुकत्याच झालेल्या पॅरीस येथील पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील क्रीडापटूंनी जिल्ह्याचे नावलौकीक जागतिक पातळीवर झळकवले आहे. ॲथलेटिक्ससाठी श्रीमती भाग्यश्री जाधव, बॅडमिंटनसाठी लताताई उमरेकर, धनुर्विद्येच्या विविध क्रीडा स्पर्धेत तेजवीरसिंग जहागिरदार, श्रृष्टी बालाजी जोगदंड, ज्ञानेश बालाजी चेरले तर किकबॉक्सिंग स्पर्धेत दिपा गवळी, ऋतिक बंडेवार, कार्तीक राठोड यांनी दिलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील योगदानाबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूंचे कौतुक केले व यावेळी त्यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. 

याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. त्यानंतर स्वच्छ नागरी विकास अभियानातर्गंत स्वच्छता ही सेवा 2024 अभियानाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी स्वत: स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी आणि अक्षय ढोके यांनी केले.

Girish Mahajan Maharashtra's progress towards an economically prosperous state through the ingenious scheme of the government
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL
Next Article Former MP Hemant Patil, President of Turmeric Research Center ; सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा  दर्जा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pandharpur News : पंढरपूरसाठी आदिलाबाद, नगरसोलवरून विशेष रेल्वे; आषाढीसाठी ५ ते ७ जुलैदरम्यान गाडी धावणार

June 29, 2025

Distribution of bicycles to female students by Rotary : रोटरीतर्फे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप -NNL

August 20, 2024

Kunbi Maratha State Level Award : उद्योजक विनायक आकुरके यांना कुणबी मराठा राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

August 27, 2024

passing away : कालवश पंढरीनाथ मकाजी राऊत यांचं दुःखद निधन

November 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Thift Arested ; प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेत गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडून पलायन करणाऱ्यास अटक -NNL

Anil Madaswar ; नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार यांची निवड — पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल

Bharat Kisan Jan Andolan : सप्तरंगी साहित्य मंडळाचा भारत किसान जन आंदोलनास जाहीर पाठिंबा -NNL

Market Committee concluded : किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न -NNL

हिमायतनगरात कुत्र्याच्या तावडीतून शेतकरी युवकाने वाचविले हरणाच्या पाडसाचे प्राण – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?