Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL
नांदेड। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतीस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामा...




