लोहा। मतदार संघाला नेता लागतो….धाडसी व खंबीर नेतृत्व लागते….. सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा सार्थ ठरणारे लोकप्रतिनिधी हवे असतात .लोहा कंधार तालुक्यातील जनतेला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या सारखे नेतृत्व हवे आहे .दहा वर्षा नंतर पुन्हा येथील मतदार चिखलीकर साहेबांना आमदार करणार आहे त्यात साठी मतदार सज्ज झाला आहे आपण भरभरून मतदान करणार आहात असा विश्वास भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केला.
लोहा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या प्रचारार्थ प्राणिताताई या गावोगावी मतदाराशी संवाद साधत आगेत. लोहा कंधार मतदार संघात पाच वर्षे तुम्ही पहिलीज्यांनामतदार संघाचीच ओळख नाही गावातील लोकांची ओळख नाही असे वाट्टेल ते बोलत आहेत. पण वीस तीस वर्षा पासून या भागाच्या जनतेनी माजी खासदार चिखलीकर साहेबांनाजोपासले आहे.
देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठविले. सतत लोकांच्या गराड्यात आणि लोकांच्या कामात साहेब व्यस्त असतात. मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही गावचा तालुक्याचा असो काम घेऊन येणाऱ्या माणसांना मदत केली जाते जिल्ह्यात फक्त चिखलीकर साहेब हेच एकमेव नेते आहेत की जेथे त्याच्यानिवासस्थानी दररोज शेकडो लोक काम घेऊन येतात आणि साहेब त्या सर्वांना भेटून त्याची अडीअडचणी सोडविता. असा नेता तुम्हा आम्हाला पाहिजे आहे.
गोरगरीब जनतेला आधार देणारे हे नेतृत्व आपण पुन्हा विधी मंडळात पाठवू यात नामदार करू यात असा विश्वास प्राणिताताई यांनी व्यक्त केला. माजी सरपंच प्रल्हाद वडजे व ग्रामस्थ उपस्थित होते प्राणिताताई याच्या प्रभावी भाषणाने ग्रामस्थ प्रभावित झाले महिला यांनी तर लाडक्या ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला.