हदगावं, शेख चांदपाशा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज ९ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय क्लब हदगाव येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेचे आयोजित करण्यात आली आहे. तरी हदगाव हिमायतनगर मतदार संघातून जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाजाने उपस्थित रहावे असे आव्हान ओबीसी नेते निळू पाटील यांनी केले आहे.


ओबीसी समाजाच्या विविध मागण्या साठी विचार आजच्या ओबीसी एससी एसटी भवितव्याचा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा जातीनिहाय जनगणना करणे मराठा व इतर कोणत्याच जातीचा नव्याने ओबीसी मध्ये समावेश करू नये महाराष्ट्र सरकारने मागील सप्टेंबर २०२३ पासून दिलेली सर्वच खोटे ५८ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे सगे सोयरे आदेश रद्द करावा २०२३ पासून खोट्या कुणबी प्रमाणपत्रावर नौकरी करीत असलेत्यांना नोकरीवरून कमी करून टाका खोटे पुरावे सादर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशा ओबीसी समाज बांधवाने आज होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आव्हान तालुक्यातील ओबीसी नेते बालाजी खरडे व निळू पाटील यांनी संयुक्तरीत्या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन जनतेला आव्हान केले आहे.यावेळी नाना गुडटवाड, राजेश फुलारे,दत्ता अनंतवार यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते.

प्रा. लक्ष्मण हाके यांची हदगाव येथे जाहीर सभा होत असून त्यांनी नांदेडहून तामसा येथे थांबून तामसा ते हदगाव बाईक रॅली व ती रॅली रामलीला मैदान हदगाव येथील थांबून व राष्ट्रीय क्लब हदगाव येथील जाहीर सभा होणार आहे. तरीही हदगाव, हिमायतनगर विधानसभेच्या सभेला ओबीसी समाज बांधवांनी जास्तीत संख्येनी सहभाग नोंदवावा असे आवाहन निळू पाटील यांनी केले आहे. विविध मागण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने जनजागरण मोहीम सुरू करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रा. लक्ष्मण हाके यांना हदगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
