नांदेड| आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्चभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार विधान परिषदेचे माजी गटनेते व प्रदेश भाजपाचे राज्य उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांची भारतीय जनता पक्षाच्या नांदेड महानगर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त धडकताच येथे आज दि.21 जानेवारी रोजी मोठा जल्लोष (Jubilation in Nanded) करण्यात आला.

नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या माजी महापौरांचे प्रतिनिधी विजय येवनकर यांच्या पुढाकारातून येथील आयटीआय चौकात फटाक्यांची अतिषबाजी करून पेढे वाढण्यात आले. यावेळी माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपाचे प्रवक्ते संतोष पांडागळे, सरचिटणीस विजय गंभीरे, लक्ष्मीकांत गोणे, किशन कल्याणकर, सदाशिव पुरी, नागनाथ गड्डम, दिपक पाटील, कामाजी सरोदे, बागड्या यादव, मनोज जाधव, अमित वाघ, साहेबराव गायकवाड, गोपी मुदिराज, शशीकांत क्षीरसागर, शाहू महाराज, सिध्दार्थ धुतराज, धीरज स्वामी, गणेश स्वामी, सुयोग कवडगी, अक्षय अमिलकंठवार किरण शिंदे इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
