श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। आगामी विधानसभा निवडणुका जाहिर होण्याचे संकेत असतांना सर्वच पक्षाचे नेते आप आपल्या परीने कामाला लागली असून सत्तेत असलेल्या नेत्याकडून विकास कामाची खैरात तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्याकडून केलेल्या कामाची आठवण करुण दिली जात आहे.परंतु किनवट – माहूर विधानसभेतील जनतेच्या मनात काही वेगळेच असल्याचे दिसत असून नव्या चेहर्याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे पहावयास मिळत आहे.तर सारखणी व परीसरातील असंख्य मुस्लीम, आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुण युवकांनी किनवट-माहूर विधानसभा क्षेञप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा ) पक्षात प्रवेश केला आहे.


किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी उबाठा पक्षात दाखल होत आहेत. दि.२ आॅक्टोबर रोजी सोना गार्डन येथे सारखणी परिसरातील असंख्य मुस्लीम , आदिवासी,बंजारा समाजाच्या नवयुवकांनी शिवसेनेत ( उबाठा ) जाहिर प्रवेश केला.या सर्वांचे ज्योतिबा खराटे यांनी स्वागत करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रलोभनाला बळी न पडता तयार राहावे असे आवाहन खराटे यांनी केले.


या प्रवेश सोहळ्याला शिवसेना उप.जिल्हाप्रमुख अनिल रुणवाल, किनवट ता.प्रमुख मारोती दिवसे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. यश खराटे,किनवट शहर प्रमुख प्रशांत कोरडे,युवासेना ता.प्रमुख अतुल दर्शनवाड,सोशल मिडीया प्रमुख शिवाजी भोसले पाटील ,उप तालुका प्रमुख अशोक साबळे,उमरी सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे,जेष्ठ शिवसैनिक राठोड सर,मा.गट शिक्षण अधिकारी आर.आर जाधव,दहेली शाखा प्रमुख विकास बोंतावार,गोंडवडसा उपसरपंच शौकत अली,अरीफ भाई,रमेश रामेवार,रमेश राठोड हे उपस्थित होते.


प्रवेश घेणाऱ्यांमध्ये आदिल, सलीम, असद, अफरोज, जुनेद, हुसेन,नईम, शाहरुख, सचिन कांबळे, नेहल पोलसवार, समीर, छोटू ,दस्तगीर शेख, अलीम शेख, अफसार, आरशद, मोसिन, रजा शेख, सलीम शेख, अस्लम शेख, अच्छू, अजय चंदेकर, यासीन शेख, समीर पाटील, समीर शेख, तालीम शेख,अफताब शेख, आदर्श पाटील, वसीम,आकताब, रेहान,अदनान कुरेशी मुकेश वानखेडे,साहील शेख,प्रथमेश लाखाडे यांचेसह असंख्य कार्यर्त्यांनी प्रवेश घेतला.तदनंतर प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी “आबकी बार ज्योतिबादादा आमदार” अशा घोषणा देत पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाची सांगता केली तर आभार प्रदर्शन अफरोज शेख यांनी केले.

किनवट – माहूर विधानसभा क्षेञ प्रमुख हे सर्वसामान्य जनतेचा आधार बनत आहेत, एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून सर्वसामान्य लोकांपासून ते तळागाळातील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहचले, त्यामुळेच शिवसेनेत अनेक लोक प्रवेश करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आम्ही असंख्य मुस्लीम युवकांनी ज्योतिबादादा खराटे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. अशी प्रतिक्रिया हूसेन शेख सारखणी यांनी दिली.


