Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Marathwada ; मराठवाड्यात उद्योग टिकले पाहिजेत
अर्थविश्व लेख March 3, 2025

Marathwada ; मराठवाड्यात उद्योग टिकले पाहिजेत

NNL TeamBy NNL TeamMarch 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजी नगर वगळता अन्य सात जिल्ह्यात उद्योगांची म्हणावी तशी प्रगती नाही. दळणवळणाची साधने असतील तर कुठलाही उद्योग टिकतो. मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भेटले होते. परंतु या दोन्ही जिल्ह्यातही उद्योगांची पीछेहाटच आहे. आता मराठवाड्यात रोजगार मेळावे भरत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून कुशल कामगार तर भेटतील, परंतु मराठवाड्यात उद्योग आहेत का हा प्रश्न बेरोजगार व तरुण वर्गाला भेडसावत आहे.

मराठवाड्यात नवनवीन उद्योग आली पाहिजेत व ते टिकले पाहिजेत . या दृष्टीने हालचाली होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मनावर घेतले तर मोठ-मोठे उद्योग मराठवाड्याच्या जमिनीवर सुरू होऊ शकतात.

परंतु त्या नेत्यांची उद्योजकांना मनधरणी करण्याची मानसिकता नाही की काय?असा प्रश्न मराठवाड्यातील बेरोजगार व युवा वर्ग उपस्थित करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठवाड्यात सद्यस्थितीला राजकीय नेते रोजगार मिळावे भरवत आहेत.

या रोजगार मेळाव्यांचा समाजाला किती फायदा होईल, ही वेगळी बाब असली तरी मराठवाड्यात उद्योग उभारणे व ते टिकविणे मोठे जिकिरीचे काम होऊन बसले आहे.दळण-वळणाच्या सुविधा असतील तर औद्योगीक वसाहतींद्वारे उद्योग टिकतात व वाढतात. यासाठी केवळ शासनाची सकारात्मक भूमिका असून चालणार नाही, त्यासाठी उद्योजकांचे प्रामाणिक प्रयत्न व मागणीप्रमाणे उद्योग असणे गरजेचे आहे.

सध्या मराठवाड्याच्या बाबतीत एक आनंद वार्ता कानावर येत आहे.एका उद्योगाच्या निमित्ताने मराठवाड्याचे नशीब पालटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरीकन इलेक्ट्रीक कार निर्माते यांची कंपनी टेस्ला भारतात प्रवेश करणार आहे. मार्चनंतर कंपनीचे अधिकारी भारताला भेट देणार आहेत. ही कंपनी जगप्रसिद्ध आहे. इलॉन मस्क हे प्रसिद्ध उद्योगपती या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि गुजरात या ठिकाणी यासाठी चाचपणी झाली. टेस्ला कंपनी भारतात किमान पाच अब्ज गुंतवणूक करू शकते. टेस्ला भारतातील वेग-वेगळ्या राज्यांत पाहणी करून सकारात्मक शोध घेत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात आजही मोठ्या उद्योगांची प्रतिक्षा आहे, त्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ही कंपनी सुरू झाल्यास मराठवाड्याचे भाग्य बदलणार आहे.

टेस्ला कंपनीच्या ईव्ही कारचे पार्ट भारतातील आठ कंपन्या पुरवतात. यापैकी तीन कंपन्या छत्रपती संभाजीनगरात आहेत. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या छत्रपती संभाजीनगरातील गुंतवणूकीला मोठा वाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरीकेच्या दौर्‍यावरून परतल्यानंतर महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होणार, असे एका कार्यक्रमात बोलले होते. त्यामुळे महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू झाला तर, तो छत्रपती संभाजीनगरात सुरू होऊ शकतो.

मराठवाड्यात पुर्वी मोठ-मोठे उद्योग होते. हळू-हळू या उद्योगांना उतरती कळा लागली, त्यामागील कारणे देखील तशीच आहेत. मोठ-मोठे कारखाने चालविणे अवघड आहे. मराठवाड्यात हळू-हळू का होईना रस्ते चांगले होत आहेत. पाण्याची कमतरता भरून निघाली तर, आणखी उद्योग तग धरू शकतात. मनुष्यबळ पुरेसे आहे.

निष्णात मनुष्यबळ उपलब्ध होणे, हे देखील तसे पाहिले तर, अशक्य नाही. सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरबरोबर अन्य जिल्ह्यांतही उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण आहे. लातूर व नांदेडच्याबाबतीत बोलावयाचे झाले तर, या दोन्ही जिल्ह्यांच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविले. परंतू ते दोघेही नांदेड किंवा लातूरला मोठे उद्योग आणू शकले नाहीत. एके काळी नांदेडला असलेली टेक्सकॉम , एनटीसी मिल प्रसिद्ध होती. त्यावेळी मराठवाड्यातून संपूर्ण देशभरात मोठा व्यापार होत होता.

परंतू नंतर वेग-वेगळ्या कारणांमुळे मराठवाड्यातील उद्योगविश्वाला उतरती कळा लागली. आजही मराठवाड्यात असलेल्या औद्योगीक वसाहतीत अनेक उद्योग बंद अवस्थेत आहेत. अनेक उद्योजकांनी उद्योग सुरू करायचा म्हणून केवळ जमिनी लाटून घेतल्या आहेत. मराठवाड्यात उद्योग न टिकण्यामागे वेगवेगळी कारणे असली तरी खंडणीखोर, अधून-मधून वेग-वेगळ्या सण-उत्सवांनिमित्त लाखो रूपयांच्या वर्गण्या मागतात. यामुळे अनेक उद्योजक त्रस्त आहेत.

याशिवाय नको त्या कारणाने आरटीई टाकून पैशांची मागणी करणारेही उद्योग पळवून लावत आहेत. कोण्या एका ठिकाणी उद्योग सुरू होणार आहे, असे कळल्यावर केवळ जागा मिळावी या उद्देशातून भूखंड माफिया जागा स्वतःच्या नावावर गुंतवून ठेवतात. उद्योग सूरू करायचा नाही, जागा दडवून ठेवायची. त्याजागेला काही वर्षांनंतर चांगला भाव आला की, ती जागा चढ्या भावाने दुसर्‍याला हस्तांतरीत करायची, या पद्धतीतून अनेक भूखंड माफिया करोडोपती झाले आहेत.

शासनाने अशा भामट्या उद्योजकांना हाकलून लावावे. ज्यांनी ज्यांनी उद्योगाच्या नावाखाली जमिनी लाटल्या परंतु त्यांनी उद्योग सुरू केले नाहीत, अशा लोकांना औद्योगिक वसाहतीतून बाहेर काढावे. जे खरोखर उद्योग उभारणार आहेत, अशांनाच जमिनी द्याव्यात व उद्योग वाढीसाठी त्यांना सोयीसवलती देऊन मोठं करावे. तसे पाहिले तर, उद्योग उभारताना जे नियम व अटी घालून दिलेले असतात, ते अनेकदा कागदोपत्री पाळले जातात, प्रत्यक्षात त्या नियमांना नंतर पाहणारे देखील कानाडोळा करतात.

या व अशा अनेक कारणांमुळे मराठवाड्यात किंबहुना महाराष्ट्रात उद्योग तग धरत नाहीत. उलट मोठ-मोठे उद्योग गुजरातला पळून गेले, अशी आरोळी ठोकली जाते. व त्यावरून मोठे राजकारण केले जाते. गुजरातमध्ये उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण आहे. एक खिडकी माध्यमातून गुजरातला उद्योग उभारता येतो. तशीच पद्धत महाराष्ट्रात किंबहूना मराठवाड्यात अवलंबविल्यास नक्कीच मराठवाड्याला उद्योगाच्याबाबतीत अच्छे दिन येतील, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. गुजरातमधील मोठ-मोठे उद्योजक परदेशात स्थायीक झालेत.

त्यांनी विदेशात अब्जोवधी रुपयांचा उद्योग उभारला. परदेशात यशस्वी झालेल्या उद्योजकांमध्ये गुजरातमधील उद्योजकांची संख्या जास्त आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे. परदेशात उद्योग करत असताना कशाचीही भिती नाही. शासनाकडून परवानग्या लवकर मिळतात. उद्योग उभारायचा असेल तर कोणालाही टेबलाखालून ‘अतिरिक्त’ द्यायची गरज नाही. याशिवाय कुठल्याही प्रकारची भिती नसल्याने करोडो रुपयांचा व्यवहार खुलेआम होतो.

तशीच पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली तर, उद्योग टिकतील व ते वाढतील देखील. असो, नांदेड, बीड, परभणी, लातूर व हिंगोली या भागांत मोठे उद्योग उभारणे गरजेचे आहे. या भागांतील नेत्यांनी उद्योग वाढीसाठी लक्ष द्यावे. सध्या मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोजगार मेळावे भरविले जात आहेत. त्यामधून तरुण-तरुणींना नोकरी देण्याचे आमिष दाखविले जात आहे. वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी कारखाने उभारणीसाठी प्रयत्न केले नाहीत. आता रोजगार मेळावे भरवून केवळ दुधाची भूक ताकावर भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. केवळ जमिनी लाटणार्‍यांची शिफारस या नेत्यांनी करू नये. ज्यांना खरोखर उद्योग उभारायचा आहे, त्यांना खरी मदत मिळणे आवश्यक आहे.

किमान अशा कामांत तरी राजकारण शिरता कामा नये. मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सात जिल्ह्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने मराठवाड्यात बेरोजगारांचा प्रश्न उभा राहिला आहे. तो प्रश्न रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नव्हे तर उद्योग उभारून तसेच मराठवाड्यातील तरुण वर्गाला हाताला काम देऊन सोडविता येऊ शकतो, याकडे मराठवाड्यातील नेत्यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

Industries should survive in Marathwada
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHarin Kharab Wildlife Safari Park : इस्लापूर येथील कोट्यावधी रुपयांचा हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत
Next Article Chandraprakash Deglurkar ; अमानवी रुढी परंपरांच्या विरोधात गुरु रविदासांनी संघर्ष केला – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

registration list : MH-26 DA नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू

Bank employees Protests : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी एकदिवसीय धरणे कार्यक्रम यशस्वी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ban on use of Dolby system : नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध -NNL

September 30, 2024

University students performed in a play : विद्यापीठातील विद्यार्थी रंगले नाट्यवाचनात ; ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचा आनंददायी वाचन सोहळा -NNL

January 7, 2025

Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL

July 9, 2024

Citizen’s health should be maintained intact | हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये स्वच्छता ठेवून नागरिकाचे आरोग्य अबाधित राखावे – NNL

July 16, 2024
Advertisement
टॉप बातम्या

169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL

9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

Children’s heart disease screening camp : लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न -NNL

Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?