HomeनांदेडHarin Kharab Wildlife Safari Park : इस्लापूर येथील कोट्यावधी रुपयांचा हरीण खरब...

Harin Kharab Wildlife Safari Park : इस्लापूर येथील कोट्यावधी रुपयांचा हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत

किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील पर्यटकांना भुरळ घालणारे अतिदुर्ग समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत. इस.सन .2022 मध्ये इस्लापूर येथील तत्कालीन वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा महत्वकांक्षी असलेल्या या सफारी प्रस्तावास मंजुरी मिळवून प्रत्येक कामांना प्रारंभ केला होता.

त्यामध्ये या सफारी पार्क मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल पाथवे, इलेक्ट्रिक व्हेईकल शेड व चार्जिंग स्टेशन, उपहारगृह निरीक्षण मनोरे , पॅगोडा,प्रसाधन गृह,मुख्य प्रवेशद्वार आणि मजबूत रस्ते व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पाळीव प्राणी पाहण्यासाठी विविध अशी देखावे यामध्ये उभारण्यात येणार होती. त्यातच तत्कालीन वन अधिकारी प्रकाश शिंदे यांची परभणी या ठिकाणी बदली झाली व हा करोडो रुपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प रखडला. त्यांच्या जागी नव्या जोमाचे सचिन धनगे नावांचे वन अधिकारी इस्लापूर वनपरिक्षेत्राला लाभले. त्यांच्या कालावधीत ही सर्व कामे गती मिळण्याऐवजी ठप्पच झाली.

IMG 20250302 WA0045 Harin Kharab Wildlife Safari Park : इस्लापूर येथील कोट्यावधी रुपयांचा हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत

विशेषता येथील हरीण पठार मराठवाड्यात प्रसिद्ध असून या ठिकाणी जवळपास 2000 हरीण ,शेकडो निलगाय ,कोल्हे यास विविध जातीची पाळीव प्राणी दररोज पाहावयास मिळतात. इस्लापूर येथील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे व उदासीनवादीपणामुळे कोट्याविधी रूपयांचा हा महत्वकांक्षी सफारी पार्क चा प्रकल्प हा अर्धवट अवस्थेत अडकल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे हा प्रकल्प जर पूर्णत्वास गेला असता तर राज्यातील व राज्याबाहेरील पर्यटकांची मंदीयाळी इस्लापूर या ठिकाणी पहावयास मिळाली असती व दुर्गम भाग असलेल्या या भागाचा विकास साधला गेला असता सदरील सफारी पार्क कडे नांदेड वन विभागाने लक्ष वेधने व अर्धवट अवस्थेत असलेल्या या सफारी पार्कच्या प्रस्तावास गती देणेआता गरजेचे बनले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments