Wednesday, May 13

Tag: Industries should survive in Marathwada

Marathwada ; मराठवाड्यात उद्योग टिकले पाहिजेत

लेख
मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजी नगर वगळता अन्य सात जिल्ह्यात उद्योगांची म्हणावी तशी प्रगती नाही. दळणवळणाची साधने असतील तर कुठलाही उद्योग टिकतो. मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भेटले होते. परंतु या दोन्ही जिल्ह्यातही उद्योगांची पीछेहाटच आहे. आता मराठवाड्यात रोजगार मेळावे भरत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून कुशल कामगार तर भेटतील, परंतु मराठवाड्यात उद्योग आहेत का हा प्रश्न बेरोजगार व तरुण वर्गाला भेडसावत आहे. मराठवाड्यात नवनवीन उद्योग आली पाहिजेत व ते टिकले पाहिजेत . या दृष्टीने हालचाली होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मनावर घेतले तर मोठ-मोठे उद्योग मराठवाड्याच्या जमिनीवर सुरू होऊ शकतात. परंतु त्या नेत्यांची उद्योजकांना मनधरणी करण्याची मानसिकता नाही की काय?असा प्रश्न मराठवाड्यातील बेरोजगार व युवा वर्ग उपस्थित करत आहे. स्था...
error: Content is protected !!