Homeमहाराष्ट्रBest Police Station : राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे 2022 मध्ये देगलूर पोलीस...

Best Police Station : राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे 2022 मध्ये देगलूर पोलीस ठाण्याची सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणुन निवड -NNL

नांदेड| सन 2016 मध्ये झालेल्या DGsp / IGsp कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर 10 सर्वात्कृष्ट पोलीस ठाण्यांची (Best Police Staion) निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रिय स्तरावर घेण्यात आला होता त्याप्रमाणे सवोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून करण्यात येते.

सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवीणे, गुणवत्ता वाढवीणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधीत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी दरवर्षी राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट 5 (पाच) पोलीस ठाण्यांची निवड करून सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येते.

भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवर सन 2022 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरिता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष द नियमावली इ. बाबी बारकाईने विचारात घेवून परिक्षेत्र / आयुक्तालय स्तरावरील समितीने निवड केलेल्या प्रत्येकी उत्कृष्ट 02 (दोन) पोलीस ठाण्यांमधून 05 (पाच) सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली होती.

सन-2022 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून 05 (पाच) पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली असून सदर 05 (पाच) पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे 2022 म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हयातील देगलूर पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणुन घोषित करण्यात आले असुन त्यांना पन्नास हजार रूपयाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

सदरची कामगीरी तत्कालीन पोलीस अधिक्षक, मा. श्रीकृष्ण कोकाटे, व विद्यमान पोलीस अधिक्षक, अबिनाश कुमार, सचिन सांगळे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर, यांचे मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोनि श्री सोहन माछरे, पोस्टे देगलूर व देगलूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगीरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments