Best Police Station : राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे 2022 मध्ये देगलूर पोलीस ठाण्याची सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणुन निवड -NNL
नांदेड| सन 2016 मध्ये झालेल्या DGsp / IGsp कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर 10 सर्वात्कृष्ट पोलीस ठाण्यांची (Best Police Staion) निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रिय स्तरावर घेण्यात आला होता त्याप्रमाणे सवोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून करण्यात येते.
सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवीणे, गुणवत्ता वाढवीणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्य...
