Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव सर्जे देशमुख व गजानन लक्ष्मण पांचाळ हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना भरधावं कारचालकाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गजानन पांचळ यांचा जागीच मृत्यू झाला.

गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शंकरराव सर्जे देशमुख यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने सरसम गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक चौकशी सुरू असल्याचे समजते. या अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोकसागर उसळला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button