Vitthal Deshamwad : मणूष्य जिवनाचा उपयोग समाजकल्याणासाठी करा…समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड

हिमायतनगर| मानवाने जन्माला आल्यानंतर जिवनाचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे म्हणून प्रत्येक माणसाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पाईक होऊन समाज जागृती निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा आजच्या तरुणाईला लागलेली व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे. याकरिता प्रत्येकांच्या गुरूंनी शिष्याकडे लक्ष दिले तर भविष्याची पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही एकदा आलेला जन्म पुन्हा येणार नाही हे डोक्यात ठेवून जगायला शिका असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळाचे समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड यांनी केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावालगत असलेल्या मल्लीनाथ महादेव येथे गुरूपौर्णिमा निमित्ताने‌ हरी भजनाच्या कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या दरम्यान व्यसनमुक्ती समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड महाराज म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पाईक होऊन आजच्या नवतरुण पिढीने ग्रामगीता, व्यसनमुक्ती, विमुक्त शेती, सेंद्रिय शेती,गायी पाळा, योगासन,ध्यान प्रार्थना यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या माध्यमातून समाज घडेल आणि भविष्यात नवतरुण पिढी व्यसनाधीनते पासुन दुर होईल.

यासाठी प्रत्येक गुरूंनी आजच्या पिढीला समाजप्रबोधन करण्याची गरज असल्याचे देशमवाड यांनी सांगितले यावेळी शेतकरी मारोती पाटील मोरे, दत्तराम कदम ,मारोती सुर्यवंशी, देवराव वाडेकर, माधवराव सुर्यवंशी, साहेबराव शिंदे, सुभाष गुंडेकर, प्रविण टोकलवाड यांच्यासह भजनी मंडळ उपस्थित होते गुरूपौर्णिमेच्या निमित्त पळसपुर येथील देवराव वाडेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button