लोहा/नांदेड। लोकसभा निवडणुकीत यावेळी वंचित बहुजन आघाडीचा ” करिष्मा ” चालला नाही. “वंचित ” आघाडीकडून उभे राहायचे मतदान घ्यायचे मतदार संघात चर्चेत यायचे अन मोठे झाले की पक्ष सोडून जायचे असेच चित्र जिल्ह्यात या पाच वर्षात निर्माण झाले. शिवाय निवडणूक काळात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची भूमिका हक्काच्या मतदाराला रुचली नाही. त्याचा जबर फटका राज्यात बसला तसाच लातूर मध्येही बसला आहे.

लोहा मतदार संघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला ३७ हजार ३०६ मते मिळाली होती पण लोकसभेत “वंचित “आघाडीच्या उमेदवारासकेवळ ९ हजार ३५३एवढीच मते मिळाली आहेत येत्या निवडणूकीत पक्षाकडून प्रबळ दावेदार असलेले व गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या गावात “वंचित”,उमेदवारास शंभरी गाठता आली नाही. पक्षाला ६५ बुथवर “शून्य ” ११६ मतदान केंद्र दहा पेक्षा कमी मतदान झाले आहे. ३३०मतदान केंद्रा पैकी१७७ बूथवर एक अंकी मतदान पाहता येत्या काळातमतदार पक्षा पासून “वंचित” होईल याचेच “मोठे आव्हान या पक्षासमोर उभे आहे. लोहा विधानसभा मतदार संघात भाजपा-,काँग्रेस अशी लढत झाली. काँग्रेस उमेदवार “लिंगायत -माला जंगम ” असल्याचा मोठा फायदा त्या पक्षाला झाला.

लातूर लोकसभेत २०१९ च्या निवडणूकीत वंचित आघाडीच्या उमेदवाराना १ लक्ष १२ हजार २१५ मते मिळाली होती यंदा केवळ ४२ हजार २२५मते पडली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६९ हजार ९९० मते कमी पडली. त्याची कारणे अनेक आहेत त्यात वंचित आघाडी मध्ये गटबाजी तर आहेच शिवाय बूथ पातळीवर संघटन नाही. अनेक बुथवर बसायला एजंट नव्हते उमेदवार फिरकला नाही. कोणतीही प्रचार यंत्रणा नव्हती. केवळ बौद्ध मतदार सोडले नंतर उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी याच्या समूहाचे मतदान सुद्धा पडले नाही कोणाचा पायपोस कोणाला नाही. प्रभावी नेता व यंत्रणा नाही. सोशल मीडिया फेल अशी अनेक करणे सांगत कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला .


लोकसभा निकालानंतर लोहा विधानसभा मतदार संघात माजी खासदार प्रतापराव पाटील यांच्या चिखली गावात काँग्रेस ६५३ मते तर भाजपा ९३६ मते, आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हळदा गावात काँग्रेस १०८० तर भाजपा -९०४ मते ,माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे याच्या बाचोटी गावात काँग्रेस १३७५ तर भाजपा ७७९ मते , माजी आमदार ईश्वरराव भोसीकर -राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिहरराव भोसीकर – संजय भोसीकर- राकॉ तालुकाध्यक्ष मनोहर पाटील -वंचितच शिवा नरंगले याच्या पानभोसी गावात काँग्रेस १०९४ मते भाजपा -८१३ मते व वंचित ९७ मते मिळाली. धोंडगे यांच्या बहादरपूर गावागावात भाजपा ११३६ मते तर भाजपा ८५३ मते मिळाली.

शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार यांच्या रामतीर्थ गावात मध्ये काँग्रेस २३०तर भाजपा ३७४ मते , भाजपाच्या हिंगोली लोकसभा संघटक चित्ररेखा गोरे याच्या मानसपुरीमध्ये भाजपा ला ४५६ मते तर काँग्रेस पक्षाला ५४८मते मिळाली आहेत.माजी आमदार रोहिदास चव्हाण -माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी -केशवराव मुकदम- शरद पाटील पवार- वसंतराव पवार – छत्रपती धुतमल -सोनू संगेवार याच्या लोहा शहरात काँग्रेस पक्षाला६हजार ३७७मते तर भाजपा ला ५हजार ६७१मते मिळाली काँग्रेस पक्षाला ७०६ मतांची आघाडी तर कंधार शहरात ७हजार २५२ मते काँग्रेस पक्षाच्या तर भाजपा ला ३ हजार ७५४ मते पडली.कंधार शहरात ३ हजार ५०३ मतांची आघाडी काँग्रेसला आहे.
काँग्रेस प्रदेश कमिटीचे सदस्य अनिल मोरे यांच्या रायवाडीत काँग्रेस ५३८ तर भाजपाला ३८८मते पडली आहे सोशल मीडियात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र येल्लवाड याच्या संगुचीवाडी गावात” कमळ’ फुलले त्यास ४२४मते तर काँग्रेसला ३४७ मते मिळाली . राज्यातील सत्ताधारी शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या अंतेश्वर गावात भाजपाला सपाटून पडले .उमेदवार श्रुंगारे विरुद्ध जाहीरपणे टीका करणाऱ्या या नेत्याला ४५२मता पैकी केवळ १६१मते घेता आली तीही चिखलीकर याच्या कार्यकर्त्यांनी खेचून आणली तर माजी शिक्षण सभापती यांनी काँगेस पक्षाला २६९मते मिळवून देत लीड दिली.
लोहा मतदार संघात वडेपुरी, उमरा, कलंबर, माळाकोळी फुलवळ, या सर्कल मध्ये भाजपा तर सावरगाव, बहद्दरपुरा, शिराढोण, कौठा या जिल्हा परिषद सर्कल मध्ये कॉग्रेस पक्षाला मतांची आघाडी आहे .भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव शिंदे यांच्या ढाकणी मध्ये भाजपा ला ५२१तर काँग्रेस २९०मते मिळाली या मतांची आघाडी पाहता शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
“वंचित”आघाडीला जबर फटका; मोठी घसरण
वंचित आघाडी या पक्षाचा आंबेडकरी जनता हाच मूळ व हक्काचा मतदार आहे. ज्या जातीचा उमेदवार दिला जातो त्या जातीचे मतदार त्या उमेदवारास मतदान करत नाहीत (?) असेच निकालाच्या आखाद्यावरून दिसते. जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले याना २०१९ च्या विधानसभेत ३७ हजार ३०६ मते मिळाली यंदा लोकसभेत वंचित आघाडी उमेदवार उदगीरकर याना केवळ या विधानसभा मतदार संघात ९ हजार ३५३ मते मिळाली.एकही जाहीर सभा वा प्रचार फेरी झाली नाही जो मते मिळाली ती केवळ आंबेडकरी जनतेची मिळाली. असेच बूथ निहाय मतावरून दिसते मग जिल्ह्याध्य व उमेदवार याच्या जातींची मते मिळविण्यात पक्षाला यश मिळाले नाही . लोहा कंधार मतदार संघात ३३०बूथ आहेत पैकी ६५ बुथावर पक्षाला शून्य ते ११७ बुथावर एक -दोन चार -पाच -नऊ अशीच एक अंकी मते मिळाली.याचा अर्थ या पक्षाचा मतदार अन्यत्र वळला आहे.
त्याचा जबर फटका येत्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला बसणार असून पक्षनेतृत्वाने “बौद्ध “मतदार गृहीत धरून नये असाच संदेश जणू मतपेटीतून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसने-माला जंगम ” या एससी प्रवर्गातील डॉ कोळगे याना उमेदवारी दिली. त्याच्यासाठी जसे लिंगायत एकवटले तसेच श्रुंगारेसाठी बौद्ध मतदार भाजपाकडे गेला .त्यामुळेच वंचितचे मताधिक्य घटले. विधानसभा असो की लोकसभा शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा “मूड ” कसा आहे हे पाहून जात”फॅक्टर प्रभावी ठरतोच हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

