Wednesday, May 13

Tag: the “base” of the “disadvantaged” collapsed; Only 97 votes in District President’s village

लोहा मतदार संघात “वंचित”चा” जनाधार “ढासळला; जिल्हाध्यक्षाच्या गावात केवळ ९७ मते -NNL

लोहा मतदार संघात “वंचित”चा” जनाधार “ढासळला; जिल्हाध्यक्षाच्या गावात केवळ ९७ मते -NNL

नांदेड
लोहा/नांदेड। लोकसभा निवडणुकीत यावेळी वंचित बहुजन आघाडीचा " करिष्मा " चालला नाही. "वंचित " आघाडीकडून उभे राहायचे मतदान घ्यायचे मतदार संघात चर्चेत यायचे अन मोठे झाले की पक्ष सोडून जायचे असेच चित्र जिल्ह्यात या पाच वर्षात निर्माण झाले. शिवाय निवडणूक काळात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची भूमिका हक्काच्या मतदाराला रुचली नाही. त्याचा जबर फटका राज्यात बसला तसाच लातूर मध्येही बसला आहे. लोहा मतदार संघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला ३७ हजार ३०६ मते मिळाली होती पण लोकसभेत "वंचित "आघाडीच्या उमेदवारासकेवळ ९ हजार ३५३एवढीच मते मिळाली आहेत येत्या निवडणूकीत पक्षाकडून प्रबळ दावेदार असलेले व गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या गावात "वंचित",उमेदवारास शंभरी गाठता आली नाही. पक्षाला ६५ बुथवर "शून्य " ११६ मतदान केंद्र दहा पेक्षा कमी मतदान झाले आहे. ३३०मतदान क...
error: Content is protected !!