नांदेड| आज दि.10 जुलै 2024 रोजी प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगाराचे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकारी महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.


यानिदर्शने आंदोलनात मुख्य मागण्या म्हणजे शालेय पोषण आहार कामगारास शासकिय सेवेत सामावून घ्या, नाही तर 26 हजार रूपयेदरमहा मानधन द्या, इंधन बिल त्याच्या खात्यावर अदा करण्यात यावे, शासकीय करारनामा रद्द करावा, शालेय व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, शालेय पोषण आहार कामगारास दिवाळी बोनस द्या व वर्षातून दोन ड्रेस द्या.


शालेय पोषण आहार कामगारास गॅस शेगडी द्या व गॅस दुरूस्ती मॅकेनिक नेमावा, शाळा प्रांगण झाडने व झेंडा राखने बंद करावे, केळी, अंडी याचे मानधन शालेय पोषण आहार कामगाराच्या खात्यावर जमा करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना निवेदन देण्यात आले.



सदरील मागण्या घेवून निदर्शने करण्यात आले आहेत. या निदर्शने आंदोलनात मोठया संख्येने सामील शालेय पोषण आहार कामगार होते. या आंदोलनातील कॉ.मारोती हारबळे, कॉ.नागोराव शिंदे, कॉ.रामदास पांचाळ, कॉ.बळीनराम गायकवाड, कॉ.सुरेखा बनसोडे, कॉ.संजय जाधव, कॉ.निता हारबळे, कॉ.देवळाबाई जाधव, कॉ.मयुराबाई गायकवाड, कॉ.गिरजाबाई दाढेल, कॉ.रेखा बोकारे आदींनी परिश्रम घेतले.



