हदगांव, गौतम वाठोरे| जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या संकल्पनेतून गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बरडशेवाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (८ मार्च) या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी सांगितले की, १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम ८ जूनपर्यंत राबविण्यात येणार असून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.


या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, डॉ. के. सी. बरगे, औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आशिष बेरळकर, बरडशेवाळा सरपंच सौनाली ज्ञानेश्वर मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के, सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर, आरोग्य सहाय्यक बालाजी राठोड, आरोग्य सेवक शेख एजाज, लाभेश्वर शेलोटे,

योगेश बांगर, प्रविण कोरडे, आरोग्य सेविका सविता टेकाळे, प्रियंका गाढेकर, सीमा पाठक, ज्योत्स्ना पडघने, चित्रा आडे, लक्ष्मी सूर्यकार, सुशिला जाधव, संगिता जाधव, परिचर बापुराव थाटे, वाहन चालक गजानन राठोड तसेच आशा सेविका वर्षा कसबे, कोंडाबाई कदम, रेखाबाई शिखरे, अंगणवाडी सेविका छायाबाई धुळधुळे, मदतनीस पुष्पा शेळके, वेदिता जमधाडे, एनएम मुक्ता पहाडे आदींसह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

