नांदेड| 64 वी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन नुकतेच नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी ढगे आदिती, कुमारी श्रुती काटकर, कुमारी राधिका कदम ,वैष्णवी जयस्वाल, कुमारी ऋतुजा शिंदे, कुमारी प्रेरणा सिंग व सोनसळे सिद्धोधन या विद्यार्थ्यांची चित्रे प्रदर्शित झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात (Honoring the students) आले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित केली जाते. त्या स्पर्धेत ही विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रक दिले जाते. त्या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी ढगे आदिती, सानिका शिंदे, साक्षी वाघमारे ,श्रुती काटकर, शहाजी मोरे या विद्यार्थ्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून बक्षीस वितरित करण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे सरांनी कौतुक केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)