नांदेडराजकीय

Home voting today for senior voters : नांदेड उत्तर मतदारसंघातील जेष्ठ मतदाराचे आज गृहमतदान -NNL

नांदेड| मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार एक ही मतदार मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी 85 वर्ष वयाच्या वरील मतदारांच्या घरी जाऊन आज मतदान करून घेतले.

WhatsApp Image 2024 11 10 at 11.45.56 PM Home voting today for senior voters : नांदेड उत्तर मतदारसंघातील जेष्ठ मतदाराचे आज गृहमतदान -NNL

आज नांदेड उत्तर मतदार संघातील कैलास नगर प्रभागातील वरिष्ठ नागरिक मोहनराव शिंदे यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. श्री शिंदे यांनी लोकसभा व विधानसभा मतदार संघासाठी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी मतदान अधिकारी सौ सरस्वती शिंदे, रोहिदास बसवंरे, सूक्ष्म निरीक्षक बालाजी अंचेवार, सहाय्यक मतदान अधिकारी आर. एम. जाधव, पोलीस कर्मचारी पांचाळ आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!