Homeक्राईमAction against Gutkha Mafia : पाळज येथे गुटखा माफियांविरुध्द कारवाई; 20 लक्ष...

Action against Gutkha Mafia : पाळज येथे गुटखा माफियांविरुध्द कारवाई; 20 लक्ष 66 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड| विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर एस.एस.टी. पाँईट पाळज येथे वाहण तपासणी दरम्याण दिनांक 28/10/2024 रोजीचे 19.25 वाजेचे सुमारास राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व गुटखा एकुण किंमत 12 लक्ष 66 हजर 400/- रुपयाचा मुद्देमाल महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन MH-37-T-3601 कि.अं. 8 लक्ष रुपयाचा असा एकुण किंमत 20 लक्ष 66 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल घेऊन वाहतूक करताना आढळून आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट व आगामी विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुक अनुषंगाने सर्व आंतरराज्य सिमेवर अवैध वाहतुक, शस्त्र, गुटखा जप्ती इ. ची वाहतुक होणार नाही याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अजित कुंभार पो. स्टे. प्रभारी अधिकारी भोकर यांनी SST पाळज व रहाटी येथील आंतरराज्य सिमेवरील असलेल्या पोलीस अंमलदार यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यावरुन पाळज येथे दिनांक 28/10/2024 रोजी 19.२५ वा.चे सुमारास पो.स्टे. भोकर येथील पोलीस शिपाई/ 3217 लहु राठोड हे भैसाकडून येणारे जाणारे वाहनांची तपासणी करीत असताना त्यांना भैसाकडून येणारा महिंद्रा बोलेरो पिकअपचा गुटखा वाहतुक संदर्भात संशय आल्याने त्याबाबतची माहिती तात्काळ पो.स्टे. प्रभारी अधिकारी, भोकर यांना दिल्याने त्यांनी तात्काळ पोस्टे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवून पाळज येथे रवाना होवून सदर ठिकाणी पोहचून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन MH-37-T-3601 ची पंचासमक्ष पाहणी करुन गुटखा असल्याची खात्री झाली.

सदर वाहनामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या नायलॉन व बारदान्याचे पोत्यामध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला, मानवी शरीरास अपायकारक असलेला पान मसाला व गुटखा एकुण किंमत 12,66,400/- रुपयाचा व महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन MH-37-T-3601 कि.अं. 8,00,000/- असा एकुण किंमत 20,66,400/- रुपयाचा मुद्देमाल जवळ बाळगून वाहतूक करीत असताना पिकअप चालक याचे ताब्यात मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून, पोलीस स्टेशन भोकर येथे अबरार अहमद खान मोहम्मद खान यांचेवर गु.र.नं. व कलमः 416/2024 कलम 223, 275, 123 भारतीय न्याय संहिता सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 59 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, साहेब, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमती शफकत आमना, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अजित कुंभार, पोउपनि/ सुरेश जाधव, पोलीस अंमलदार – पोहेकाँ /2820 भीमराव जाधव, पोहेकाँ / 2152 प्रकाश वाळवे, पोकाँ / 3217 लहु राठोड, पोकाँ / 3162 गुरुदास आरेवाय पो.काँ/2464 प्रमोद जोंधळे चापोकों/ 440 मंगेश क्षिरसागर यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments