HomeनांदेडHunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

Hunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील मौजे पारवा मोरगावच्या विकासकामांमध्ये झालेल्या कथित अनियमितता, अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मौजे पारवा मोरगाव येथील सूरज बबनराव बोने यांनी 26 जानेवारीपासून हिमायतनगर तहसील–पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या लेखी चौकशीच्या आश्वासनानंतर, हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रफिक शेठ यांच्या हस्ते पाणी पिऊन बोने यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र, योग्य चौकशी होऊन दोषींवर ठोस कारवाई झाली नाही, तर पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पत्रकारांशी बोलताना सूरज बोने म्हणाले, “हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गावाच्या विकासासाठी, न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. ग्रामस्थांचे पैसे व हक्क सुरक्षित राहावेत, यासाठी मला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.”

IMG 20260127 WA0026 scaled Hunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

पारवा मोरगाव येथे 2020 ते 2026 या कालावधीत विविध विकासकामे राबवण्यात आली. मात्र त्यातील अनेक कामे अद्याप अपूर्ण असून, काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही कामे कागदोपत्री पूर्ण दाखवली असली तरी प्रत्यक्षात ती अस्तित्वात नसल्याचा गंभीर दावा बोने यांनी केला आहे.

गावात तीन वर्षांनंतरही वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित नाही, दलित वस्तीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांचे हाल, एमबी (MB) व अंदाजपत्रकात कथित फसवणूक, प्रत्यक्ष खर्च कमी, कागदोपत्री खर्च जास्त दाखवण्यात आल्याच्या प्रकारामुळे गावातील सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप केला जात असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आले होते.

दिनांक 27 रोजी पंचायत समिती प्रशासनाकडून उपोषण करताना लेखी आश्वासन देण्यात आले असून, प्रशासनाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही चौकशी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कारवाईत रूपांतरित होते का..? यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments