Wednesday, May 13

Tag: The indefinite hunger strike in front of the Panchayat Samiti office

Hunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

Hunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील मौजे पारवा मोरगावच्या विकासकामांमध्ये झालेल्या कथित अनियमितता, अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मौजे पारवा मोरगाव येथील सूरज बबनराव बोने यांनी 26 जानेवारीपासून हिमायतनगर तहसील–पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या लेखी चौकशीच्या आश्वासनानंतर, हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रफिक शेठ यांच्या हस्ते पाणी पिऊन बोने यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र, योग्य चौकशी होऊन दोषींवर ठोस कारवाई झाली नाही, तर पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रकारांशी बोलताना सूरज बोने म्हणाले, “हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गावाच्या विकासासाठी, न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. ग्रामस्थांचे पैसे व हक्क सुरक्षित राहावे...
error: Content is protected !!