HomeनांदेडDistrict Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर बाळकृष्ण कदमांची वर्णी; एकनिष्ठेचे मिळाले...

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर बाळकृष्ण कदमांची वर्णी; एकनिष्ठेचे मिळाले फळ -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभेचे भाजप नेते डॉ. अशोक सूर्यवंशी यांचे अत्यंत विश्वासू बाळकृष्ण कदम यांची जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य म्हणून दि. ०६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

बाळकृष्ण कदम यांची निवड डॉ. अशोक सूर्यवंशी यांच्या शिफारशी नुसार झाली आहे. या समितीमध्ये किनवट विधानसभेतून सर्वात तरुण आहेत. १२ वर्षाच्या पत्रकारितचा अनुभव असणारे एम. ए. बि. एड्, बी.जे पर्यंत शिक्षण झालेले आहे. कदमांच्या निवडीने खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्याची जनभावना व्यक्त होत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रसिद्धीप्रमुख, बुथ संपर्क अभियान संयोजक, बुथ सशक्तीकरण अभियान प्रमुख, नगरपरिषद स्वच्छता दूत अशा कामांचा अनुभव असणारे पक्षाशी एकनिष्ठ असणारे कदमांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्ष वाढीसाठी आम्ही रात्रंदिवस एक करू अशी भावना यावेळी काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा नियोजन समितीवर माझी निवड ही माझी निवड नसून प्रामाणिक व एकनिष्ठ काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची निवड आहे ; असे मी समजतो. मिळालेल्या संधीचे सोने करावे या भावनेतून आपल्या भागाचा कशाप्रकारे विकास करता येईल हे मी प्रकर्षाने बघणार आहे. माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments