नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सवांतर्गत मंगळवारी (ता.३) नांदेड केंद्रात सादर झालेल्या तन्मय ग्रुपच्या “वसुधैव कुटुंबकम” या नाटकाने प्रेक्षकांना स्तब्ध केले. या नाटकाने नालंदा महाविहाराच्या दुर्दैवी इतिहासाला उजाळा देत, भारतीय शिक्षण परंपरेच्या महत्त्वावर विचारमंथन घडवले. दिग्दर्शक नाथा चितळे यांनी त्यांच्या सर्जनशील दिग्दर्शनातून हा विषय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.
या नाटकाचे कथानक प्राचीन नालंदा विश्वविद्यालयाच्या स्थापनेपासून ते बख्तियार खिलजीच्या आक्रमणात झालेल्या विनाशापर्यंतचा प्रवास उलगडते. एकेकाळी ज्ञानाचा महासागर असलेल्या या विद्यापीठात विविध धर्म, शास्त्र आणि कलांचा अभ्यास विनामूल्य शिकवला जात होता. पण खिलजीच्या आक्रमणाने संपूर्ण ज्ञानसंपदा जाळून टाकली. नाटकात मैत्रीयी देवी, श्रमण स्त्री आणि इतर पात्रे नियतीचे प्रतीक म्हणून सादर केली आहेत. त्या विनाशक प्रारब्धाला बदलण्यासाठी धडपड करतात, मात्र शेवटी नियतीचा विजय होतो. नाटकाच्या निमित्ताने समाजात ज्ञानाची पुनर्स्थापना आणि जागृती होण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
आजच्या शिक्षण क्षेत्रातील विकृती आणि व्यवसायीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा प्रयोग ठरला. “हे विश्वची माझे घर” ही वसुधैव कुटुंबकमची शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात नाटक यशस्वी ठरले.हे नाटक केवळ ऐतिहासिक घटना मांडून थांबत नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते की आपण आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा वारसा जपण्यासाठी काय करतो आहोत. या प्रयोगातून प्रेक्षकांना एक महत्त्वाचा संदेश दिला गेला, की शिक्षण आणि ज्ञानाचा वारसा जिवंत ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
‘वसुधैव कुटुंबकम’मध्ये विविध पात्रांनी प्रेक्षकांना प्रभावित केले. शुभांगी वाणी (नालंदा नगरी/मैत्रीयी देवी), नागेश लोकडे (बावळट बाळ), प्रीतम विलास भद्रे (आचार्य राहुल श्रीभट्ट), आदित्य उदावंत (बख्तियार खिलजी), कु. पूजा सुपेकर (नझिरा बेगम), प्राणहिता तलवारे (मझली बेगम), कु. दिव्या शेळके (छोटी बेगम), सौ. नीलिमा चितळे (बाळाची आजी), रोहन कदम (धम्मपाल), नितीश देशपांडे (वर्धनानंद), प्रणव चौसाळकर (आचार्य आर्यभट्ट), सुनील कौठेकर (आचार्य नागार्जुन), सुमित नाईक (आचार्य वसुबंध), गाणारा भिकू (राहुल), युनानी हकीम (नाथा चितळे), आणि पाठशाळेतील मुले (नेहा हापगुंडे, मानसी चौधरी, सानवी चौधरी, संजिवनी शिदे, प्रणव दिग्रसकर, आधिराज जालनेकर, भावेश तिलके) यांनी आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या.
पाठशाळेतील मुले : नेहा हापगुंडे, मानसी चौधरी,सानवी चौधरी, संजिवनी शिदे, प्रणव दिग्रसकर, आधिराज जालनेकर, भावेश तिलके , अध्यापक : आयुष केंद्रे , पठाणी सैनिक : राजेश कैरमकोंडा , गोपाल सायबी, हर्षवर्धन कळम, हरी कल्याणकर ऋषिकेश कल्याणकर,अरुण सांडगे
समूहांचा सहभाग
बौद्ध भिकूंचा समूह: आनंद कांबळे, शिरीष बडगावकर, युवराज कौसाडीकर, वल्लभ देशपांडे, समिहन गुरु
जैन मुनींचा समूह: प्रद्युम्न धुळसे, सौरव नळगे, नामदेव कुलकर्णी, वरद पाटील
सनातन पंडितांचा समूह: ऋषिकेश कराळे, सिद्धांत वेदपाठक, लक्ष्य चिंचमलातपुरे, आदित्य केंद्रे, पार्थ अत्करी, आयुष केंद्रे
पठाणी सैनिक: गिरीश रघौजीचार, राजेश गोपाल, कैरमकोंडा गोपाल, गणेश सायबी, हर्षवर्धन कळमपाटील, हरी ओम कल्याणकर, ऋषिकेश कल्याणकर, अरुण सांडगे
तांत्रिक बाजूला मजबूत साथ
नेपथ्य: भीमाशंकर निळेकर कुलकर्णी
प्रकाश योजना: चेतन धवले
पार्श्वसंगीत: भूषण भावसार
रंगभूषा व वेशभूषा: गजश्विनी देलमाडे
उद्घोषिका: कु. सुरभी हसूर
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सुरु असलेली ही मराठी राज्य नाट्य स्पर्धा स्पर्धा अप्पर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, सह-संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.