बिलोली। जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय व अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ डिसेबर २०२४ रोजी सोमवारी दुपारी १२: ३० वाजता उपजिल्हा रुग्णालयापासून ते जुना बसस्टँड ते परत रुग्णालय अश्या मुख्य रस्त्याने एड्स विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.
जागतिक एड्स दिनानिमित्त उपस्थित सर्वांना अल ईम्रान प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.मोहसीन खान यांनी एड्स विरोधाची शपथ दिली.तदनंतर या एडस जनजागृती रॕलीस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पांडूरंग पावडे यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फेरीस सुरूवात करण्यात आली. ओंकार नर्सिंग स्कूलचे विद्यार्थीनीनी फेरीत हातात फलक,बॅनर घेऊन सहभाग नोंदविला होता.विविध घोषवाक्यांनी रॅली दणाणून गेली. यावेळी डॉ.अश्विनी अन्नमवाड,डाॅ पुजा काळे,डाॅ तन्जिल बेग,डॉ.अक्षय गायकवाड यांच्यासह सर्व नर्स,ज्येष्ठ पत्रकार भिमराव बडुरकर, शिवराज रायलवाड,सय्यद रियाज आदिंची उपस्थिती होती.
रॅलीत गंगाधर कांबळे, दिपक गायकवाड,प्रफुल्ल कल्याणकार, संजय तोटलवार,अनिल नलमेलवार, बाबा नाईकवाडी, १०८ च्या रूग्णवाहिकेचे चालक मिर्झा जाफर बेग,१०२ च्या रुग्णवाहिकेचे चालक महेश हळीखेडे, ओंकार नर्सिंग स्कूलचे शिक्षक दिपक यन्नावार,निलेश चव्हाण, उज्ज्वला निम्मनवार अदिंनी सहभाग नोंदवला.एडस रॅली यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे आयसीटीसीचे समुपदेशक देविदास भोईवार यांनी व त्यांच्या विभागाच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी उपस्थितांचे आभार अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहसीन यांनी मानले.