Thursday, May 14

Tag: History of Nalanda University unfolded on stage; ‘Vasudhaiva Kutumbakam’

Vasudhaiva Kutumbakam : नालंदा विद्यापीठाचा इतिहास रंगमंचावर उलगडला ; ‘वसुधैव कुटुंबकम‘ने नाट्य रसिकांना विचारमग्न केले -NNL

Vasudhaiva Kutumbakam : नालंदा विद्यापीठाचा इतिहास रंगमंचावर उलगडला ; ‘वसुधैव कुटुंबकम‘ने नाट्य रसिकांना विचारमग्न केले -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सवांतर्गत मंगळवारी (ता.३) नांदेड केंद्रात सादर झालेल्या तन्मय ग्रुपच्या “वसुधैव कुटुंबकम” या नाटकाने प्रेक्षकांना स्तब्ध केले. या नाटकाने नालंदा महाविहाराच्या दुर्दैवी इतिहासाला उजाळा देत, भारतीय शिक्षण परंपरेच्या महत्त्वावर विचारमंथन घडवले. दिग्दर्शक नाथा चितळे यांनी त्यांच्या सर्जनशील दिग्दर्शनातून हा विषय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. या नाटकाचे कथानक प्राचीन नालंदा विश्वविद्यालयाच्या स्थापनेपासून ते बख्तियार खिलजीच्या आक्रमणात झालेल्या विनाशापर्यंतचा प्रवास उलगडते. एकेकाळी ज्ञानाचा महासागर असलेल्या या विद्यापीठात विविध धर्म, शास्त्र आणि कलांचा अभ्यास विनामूल्य शिकवला जात होता. पण खिलजीच्या आक्रमणाने संपूर्ण ज्ञानसंपदा जाळून टाकली. नाटकात मैत्रीयी देवी, श्रमण स्त्री आणि इतर पात्रे नियतीचे प्रतीक म्हणून सादर केली आहेत. त्या विन...
error: Content is protected !!