हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा खुर्द ते पोटा बु.कडे जाणाऱ्या रस्त्यावर अल्पसा पाऊस होताच मोठ्याप्रमाणात चिखल होत आहे. परिणामी पोटा बु. येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनीसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि समस्या लक्षात घेता लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने दखल घेऊन गावाजवळील रस्त्यासाठी मंजूर घेऊन रास्ता चांगला करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे .
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा खुर्द येथील नागरिकांना बाजारासाठी पोटा बु. येथे येऊन बसने व खाजगी वाहनातून भोकर व हिमायतनगर येथे जावे लागते. तर विद्यार्थिनी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पोटा बु जवळगाव हिमायतनगर भोकर येथे जावे लागते. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही रिमझिम पाऊस बरसात असल्याने पारवा गावाजवळील रास्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे रस्त्याची घसररगुंडी होत असून, रस्त्याने पायी चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
तर दुचाकी सारखे वाहने स्लिप होऊन किरकोळ अपघात होऊ लागले आहेत. हा रास्ता पूर्ण करून कायमची समस्या सोडवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या रस्त्याकडे सर्वानीच दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता प्रलंबित आहे. आता पावसाळा सुरु झाल्याने पुन्हा या रस्त्याची समस्या ऐरणीवर आली आहे. लोकप्रतिनिधींना वेळो वेळी निवेदन दिले मात्र कोणीही दखल घेतली नाही. येत्या महिनाभरात रस्त्याची दखल न घेतल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. आशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.