श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहेरे| श्री दत्त जयंती पौर्णिमा उत्सवाच्या पावनमुहूर्त समयी दि.१६ रोजी मौजे हरडप ग्राम नगरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन स्थापना करण्यात आली.यावेळी श्री दत्त शिखर संस्थान श्री श्री महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात मंदिराची भव्य कृती बांधकाम प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी गावातील सर्व मुली व त्यांचे पती जावई यांच्या हस्ते कळसाची स्थापना करण्यात आली व त्यांना सन्मानित करण्यात आले.
मौजे हरडप ग्रामनगरीत श्री हनुमान मंदीर,महादेव मंदिर लक्ष्मी मंदिर,ग्रामदेवता मंदिर त्यानंतर त्याच परिसरात भव्य असे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना करण्यात आली गावात भजन कीर्तन सह प्रवचन, काकड आरती वारकरी सामूहिक भजनी मंडळ नित्यनेम वर्षभरात भक्तीमय वातावरणात धार्मिक कार्य पार पाडले जाते. ग्रामनगरीत शेतकरी शेतमजूर व्यापारी कर्मचारी सर्व स्तरातील गणमान्य व्यक्ती असल्याने शेती व शेतीवर निगडित व्यवसाय असल्याने वारकरी संप्रदायाचा वर चष्मा असलेले हरडप हे गाव तालुक्यात सर्वत्र परिचित आहे. त्यानिमित्ताने ग्रामदेवतेची पूजा अर्चना करून गावातील समस्त नागरिकांना आरोग्य समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रार्थना केली जाते.
मौजे हरडप ग्राम नगरीत मंदिर उभारणीसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक पंजाबराव पाटील टनमने, आनंदराव दळवे, विनायकराव टनमने, सुधाकर वाटकर, विठ्ठल दळवे, सरपंच दीपक किनाके, दत्ता महाराज निलेवाड, विलास गणा राठोड, राजू राठोड, दुधराम जाधव, मोहन महाराज, निलेश टनमने, सुदेश अग्रवाल, सेवाजी चव्हाण, नागोराव खामनकर यांच्यासह असंख्य महिला बालगोपाल युवक शेतकरी शेतमजूर ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे .