हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द ते पोटा बु. रस्त्यावर अल्प पाऊस होताच चिखलाचे साम्राज्य विद्यार्थिनीसह नागरिक त्रस्त – NNL
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा खुर्द ते पोटा बु.कडे जाणाऱ्या रस्त्यावर अल्पसा पाऊस होताच मोठ्याप्रमाणात चिखल होत आहे. परिणामी पोटा बु. येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनीसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि समस्या लक्षात घेता लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने दखल घेऊन गावाजवळील रस्त्यासाठी मंजूर घेऊन रास्ता चांगला करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे .
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा खुर्द येथील नागरिकांना बाजारासाठी पोटा बु. येथे येऊन बसने व खाजगी वाहनातून भोकर व हिमायतनगर येथे जावे लागते. तर विद्यार्थिनी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पोटा बु जवळगाव हिमायतनगर भोकर येथे जावे लागते. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही रिमझिम पाऊस बरसात असल्याने पारवा गावाजवळील रास्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे रस्त्याची घसररगुंडी होत असून, रस्त्याने पायी चालण्...
