धार्मिकनांदेड

Visarjan Procession at CIDCO : सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ -NNL

नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत या वर्षी जय व्येकंटेश महालक्ष्मी गणेश मंडळ पॉवरलूम व जय महाराष्ट्र गणेश बळीरामपूर चा देखावा उत्कृष्ट ठरला असून अनेक ठिकाणी या मंडळाने सादरीकरण करून भाविक भक्तांची मने जिंकली.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जयव्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळाचे अध्यक्ष विशाल तोगलवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली याही वर्षी श्रीकृष्ण अन सुदामा यांचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत म्यानेटवार,संतोष जिंदम ,प्रकाश तोगलवार,नारायण अलसटवार, नरसिंग झुंझुरवार, शंकर दासेवार ,गजानंद सिरसुलवार, विशाल तोगलवार,गजानंद कोकुलवार, संजय अलसटवार, शंकर गोन्टलवार यांनी जय महाराष्ट्र गणेश मंडळ बळीरामपूरचे अध्यक्ष संतोष अलसटवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रावण अहंकार हरण यांचा देखावा कलाकार सुनिल सोळंके रघु म्यानेवार,मंगेश लोकमन्नवार, ओम बोटलवार,मारोती कदम, मुकेश लोकमनवार,ओम बोटलवार, अविनाश श्रीमेवार, वैभव म्यानेवार यांनी भुमिका साकारली होती.

सिडको हडको परिसरातील अनेक भागात सादरीकरण केलेल्या या देखाव्याला अनेक ठिकाणी ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत कलाकारांना प्रोत्साहन दिले तर छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मान केला तर अनेक ठिकाणी सादरीकरण कलाकाराचे स्वागत करण्यात आले, या दोन सजिव देखावा सादरीकरण मुळे मुख्य मिरवणुकी मुळे श्री विसर्जन मिरवणुकीत ऊत्साह दिसून आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button