क्राईमनांदेड

Himayatnagar police caught the amplifier thief in just 24 hours | हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या ऍम्प्लिफायर चोरट्याच्या मुस्क्या – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार। सीसीटीव्ही फुटेज आणि विविध नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिमायतनगर पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास करून भोकर तालुक्यातील बोरगाव रोडवर मुद्देमालासह ऍम्प्लिफायर चोरून नेणाऱ्या चोरट्याला दिनांक 29 रोजी रात्री अटक केली आहे. रात्री उशिरा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातन कालीन लकडोबा हनुमान मंदिरातील साहित्याच्या चोरीतील आरोपींस पोलिसांनी तात्काळ अटक केल्यामुळे भाविक भक्त व शहरवासियातून पोलिसांच्या कामगिरीचे अभिनंदन केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर व परिसरात काही दिवसापासून चोरटे सक्रिय झाले असून, पावसाची रिपरिप चालू असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून पुरातन कालीन लकडोबा हनुमान मंदिरातील एम्प्लिफायर अज्ञात चोरट्याने रविवार दिनांक २८ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चोरून नेला होता. सदर चोरटा हा लकडोबा चौकातील हनुमान मंदिरातून एप्लीफायर घेऊन जातांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मंदिर कमिटीने सण उत्सवाचे दिवस जवळ आल्याने नव्यानेच ऍम्प्लिफायर सेट विकत आणला होता मात्र महिन्यातच चोरट्याने यावर हाथ साफ केल्याने मंदिर कमिटीच्या लोकांची चिंता वाढली होती.

दरम्यान चोरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल होऊन पोलिसांनी सीटीव्ही फुटेज तपासली. त्यात चोरटा डोक्यावर भगवी दस्ती टाकून डाव्या हातात एम्प्लिफायर घेऊन जाताना दिसून आला. त्या आधारे आणि गुप्त बातमीदाराकडून चोरटा कोणत्या दिशेने गेला याची माहिती मिळविली. घटनेची माहिती वरिष्ठाना देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तसेच गुप्त माहितीच्या आधारे भोकर – बोरगाव रोडवर असलेल्या शाहू विद्यालय शाळेजवळून चोरटा गणेश यादव भालेराव वय ४५ वर्ष रा. भोकर यास रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे.

आरोपीची विश्वासाने विचारपूस केली असता त्याने हिमायतनगर येथील लकडोबा हनुमान मंदिरातील एम्प्लिफायर चोरून नेल्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याचेकडून एप्लीफायर किंमत ४० हजार रूपये जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कोमल कांगणे, पोहेकाॅ. श्यामसुंदर नागरगोजे यांनी केली आहे. धार्मिक आस्था असलेल्या मंदिरातील चोरीचा तपास पोलिसांनी अवघ्या २४ तासात लावून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याबद्दल मंदिर कमेटी व शहरातील भाविक भक्त आणि नागरीकातून हिमायतनगर पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले जात आहे. अशीच तत्परता दाखवीत पोलिसांनी शहरात चोरीच्या घटना घडणार नाहीत यासाठी रात्रगस्त वाढवावी अशी मागणी सुजाण नागरीकातून केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button