हिमायतनगर| शहरातील वार्ड क. ७ डाॅ. अण्णाभाऊ साठे नगर व तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर भागात भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई चा प्रश्न भेडसावत आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे. या भागातील सार्वजनिक बोअर ( कुपनलीका ) ही गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने पाणीटंचाई ने उग्र रूप धारण केले आहे.


अण्णाभाऊ साठे नगर व तसेच डाॅ. अंबेडकर नगर भागात मजूरवर्ग जास्त प्रमाणात वास्तव्यास आहे. सध्याला या भागातील सार्वजनिक बोअर बंद झाला असल्याने नागरिकांना पाणीटंचाई चा प्रश्न सतावत असून काम बुडवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या बाबींकडे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष पुरवून या ठिकाणी बंद बोअर तात्काळ दुरूस्त करावा. व नळ योजनेच्या टाकीचे पाणी नळाला सोडण्यात यावे.


अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बनसोडे, अण्णाभाऊ क्रांतीसनेचे शहराध्यक्ष गजानन वाघमारे, माधव बनसोडे, रामेश्वर बनसोडे, विकास मनपुर्वे, रामेश्वर गुंडेकर, तुकाराम सोळंके, नंदकिशोर बनसोडै, मारोती बनसोडे, राजेश वाघमारे, रवि बनसोडे, रितेश वाघमारे, विश्वजीत गुंडेकर, गणेश दमालवार, शुद्धोधन हनवते, बालाजी बनसोडे, सुरज बनसोडै, संदिप गुंडेकर, गजानन बनसोडै, राहूल बनसोडे यांनी केली आहे.




