खासदार आमदारांनी उद्घाटन केलेल्या व ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या हिमायतनगर- सिरपल्ली रस्ता पाहिल्याचं पावसात चिखलमय; नागरिक वाहनधारकांचे बेहाल -NNL
संबंधीत बांधकाम विभागाची अनास्था आणि राजकीय नेत्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे मुदत संपूनही रस्त्याचे काम अर्धवट

हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाकडून सण 2022 मध्ये निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आमदार खासदाराच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आलेल्या हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन वर्षभरापूर्वी ठेकेदाराने पलायन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर आजच्या रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक वाहनधारकांना मात्र दुचाकी व चारचाकीला लागलेल्या चिखलाचे पेंढ काढता काढता नाके नऊ आल्याने राजकीय नेते व संबंधित गुत्तेदारासह अभियंत्यांच्या नावाने बोट मोडण्याची वेळ आली आहे.


हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम दोन वर्षांपासून अत्यन्त संत गतीने केले जाते आहे, एव्हढंच नाहीतर वर्षभरापासून ठेकेदाराने रस्त्याचं काम अर्धवट ठेऊन पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदार आमदार खासदार यांच्या दुर्लक्षित कारभार, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन नामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत.

अर्धवट रस्त्यामुळे अनेकांना उन्हाळ्यात उघडी पडलेल्या गिट्टी व खड्डयासह अर्धवट रस्त्यामुळे वाहनधारकांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार व अपघाताचा सामना करावा लागला आहे. आता पावसाळ्यात देखील अर्धवट रस्त्यावर अल्पसा पाऊस होताच चिखलम रस्ता झाल्याने ये जा करतांना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असून, त्यात भर म्हणजे दुचाकी व चारचाकीला लागलेल्या चिखलाचे पेंड काढून वैताग आला आहे. या रस्त्यापेक्षा रस्ता न होता पूर्वीचा रस्ता चांगल्या पद्धतीचा होता असे म्हणण्याची वेळ वाहनधारक गावकऱ्यांवर आली आहे.


नांदेड – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर – पार्डी – एकघरी या ११.९९० किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला होता. दि. ७ जानेवारी २०२२ ला तातक खासदार हेमंत पाटील आणि विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सदरील रस्ता कामाच्या फलकाचे अनावरण करून सुरुवात करण्यात आली होती. एव्हडेच नाहीतर पुन्हा ५ वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५० लक्ष रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आली.

या रस्त्याचे काम ठेकेदार में एम एस सिद्दीकी, औरंगाबाद मार्फत राजकीय वरद हस्त असलेल्या एका सब ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे अडीच वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला तरी अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण न करता अर्धवट ठेऊन संबंधित पलायन केल्याने या भागातील ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने देऊन काहीच फरक पडला नाही. त्यामुळे 4 महिण्यापूर्वी तीन दिवस साखळी उपोषण केलं तिसऱ्या दिवशी आमदार माधवराव पाटील जवळगावखर यांनी भेट देऊन गुत्तेदारासह अभियंत्याची बैठक घेऊन तात्काळ कामाला सुरुवात करा अश्या सूचना दिल्या. ठेकेदाराने रस्ता कामासाठी केवळ गिट्टीचे ढग आणून टाकले मात्र रस्त्याचं काम जैसेथेच ठेवले आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी अर्धवट काम ठेवणाऱ्या गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकू कारवाई करून या रस्ता कामाची पुनर्रनिविदा काढण्यात येऊन अन्य ठेकेदारामार्फत काम करून द्यावं अशी मागणी पावसाळ्यापूर्वी केली, मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या खात्याने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे पावसाळ्यात रस्ता चिखलम झाला असून, अनेकांची घसरगुंडी होऊन किरकोळ अपघात होत आहेत. या रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांचे जीव गेल्यावर रस्त्याचे काम पूर्ण होईल का असा संतापजनक सवाल गावकरी विचारत आहेत. पावसाळ्यात नागरिकांचे होणारे बेहाल लक्षात घेता हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तरी दोन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचं काम मार्गी लाऊन विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याची कायम कटकट दूर करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार सूर्यकांताताई पाटील यांनी शिरपल्ली ते वाशी पर्यंत रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता बनून ग्रामीण खेडे पाडे मुख्य रस्त्याला जोडले होते. जवळपास दहा ते बारा वर्षे रस्ता चांगला होता. त्यानंतर देखरेख करणाऱ्या ठेकेदारांनी थातूरमातूर दुरुस्ती केली आणि रस्त्याची पूर्णतः वाट लावून टाकली. अनेकदा मागणी केल्यावर दोन खासदाराचा कार्यकाळ गेल्यानंतर तिसऱ्या खासदाराच्या टर्ममध्ये या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. 2022 मध्ये कामाला सुरुवात झाली मात्र तेही काम अर्धवट अवस्थेत असून, या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या शेवटपर्यंत म्हणजे हिमायतनगर शहरापासून ते वाशी पर्यंत मधील रस्त्याचे तुकडे करून प्रधानमंत्री ग्राम सडक रस्त्यातील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळेच की काय..? या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे अशी शंका देखील रस्त्याच्या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांना येऊ लागली आहे.



