नवीन नांदेड| गणेशोत्सव निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर,ईतवारा उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले.


जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार गणेशोत्सव व अंनत चतुर्थी श्री विसर्जन निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या माता रमाई चौक ढवळे कॉर्नर ते राज कॉर्नर, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे मार्ग, ज्ञानेश्वर नगर मार्ग, हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान या मार्गावर पोलीस पथसंचलन करण्यात आले.


गणेशोत्सव दरम्यान व अनंत चतुर्दशी निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पथसंचलन करण्यात आले,यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, सहाय्यक विजय कांबळे, सचिन गढवे,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड,बाबुराव चव्हाण,नाईक यांच्या सह सात अधिकारी, यांच्या सह आरसीपी दोन तुकडी महिला पुरुष, एस आर पीएफचा तिनं तुकड्या ,30 पोलीस अंमलदार, महिला पोलिस, 35 होमगार्ड,महिला होमगार्ड यांच्या समावेश होता.




