हदगांव, शेख चांदपाशा| सावरगाव माळ (ता. हदगाव, जि. नांदेड) येथे आई-वडील नसलेल्या दोन अनाथ बालकांना रयत सेवाभावी प्रतिष्ठान, जवळगावच्या माध्यमातून दानशूर दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. 1 एप्रिल 2025 रोजी या मदतीतून किराणा सामानाच्या किटचे वितरण करण्यात आले.


यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, माता-भगिनी, बालगोपाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमास रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावचे संस्थापक अध्यक्ष श्री. सटवाजी पवार, राजेश पांडे (हदगाव), प्रभाकर दहिभाते (बरडशेवाळेकर, दैनिक सकाळ), बंडू माटाळकर (निवघेकर, दैनिक सकाळ), बोरकर (शिरडकर, दैनिक लोकमत), श्री. इस्माईल भाई पिंजारी (बामणी फाटा, दैनिक देशोन्नती),


सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविताताई निमडगे मॅडम (पळसेकर), श् हरिश्चंद्र चिलोरे, दिलीपसिंह ठाकुर (सावरगावकर माळ), श्री. संतोष भाऊ धावंडकर, प्रमोदसिंह गौर(जवळगांवकर), भगवानसिंह ठाकुर (सावरगावकर माळ) तसेच अनेक दानशूर दाते आणि मान्यवर उपस्थित होते.ही मदत गरजू लेकरांसाठी मोठा आधार ठरणार असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा उपक्रमांना हातभार लावावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे अहवान करण्यात आले.




