Triple accident : हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात ; दोन ठार, आठ जखमी
हदगाव, गौतम वाठोरे| तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर सुरू असलेल्या डागडुजीच्या कामादरम्यान कोणतेही पर्यायी रस्ते किंवा सूचना फलक न लावल्याने भीषण तिहेरी अपघात घडला. दिनांक १८ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हदगावपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावरील भानेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे.
महामार्गावर डागडुजेसाठी फिरणारे जेसीबी वाहन, नांदेडवरून आर्णीकडे जाणारे आयशर वाहन आणि चाकूरवरून चंद्रपूरकडे जाणारे चारचाकी अशा तिन्ही वाहनांच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश
लातूर येथील मनोज रामराव देवगुरे (३४) आणि मंजुषा देवदास आईलवार (३७) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मनोज देवगुरे हे सॉफ्टवेअर इंजिनीयर असून ते मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी कुटुंबासह चंद्रपूरकडे जात होते. तर या अपघातात गंभीर जखमी झालेले ...


