नांदेडधार्मिक

Navratri festival of Satya Devi ; सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते महाआरती

नवीन नांदेड l कांकाडी सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने बागल व सहयोगी परिवाराच्या वतीने महाआरती आयोजन करण्यात आले होते, यावेळी नांदेड शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

काकांडी येथे आयोजित होणाऱ्या सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव महाआरती साठी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्यी 29 सप्टेंबर रोजी प्रमुख उपस्थिती होती, यावेळी आरती नंतर महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आले होते, गावातील महिला ,जेष्ठ नागरिक व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावातील माजी सरपंच सुदीन बागल यांच्या सह बळीरामपुर माजी सरपंच अमोल गोडबोले,रवी थोरात ,बळीरामपुर ऊपसरपंच नागेश वाघमारे,दता पाटील कदम, नारायण भांडवले, बाबुराव गजभारे,चेअरमन प्रल्हाद पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बागल,नाना‌ पाटील बागल,संजय बागल,चपंती जाधव, बालाजी गगातीरे ,अशोक कदम, दिलीप कदम, गजानन कदम,ऊतम बागल,दशरथ पाटील बागल,काळेश्वर बागल, संतोष बागल, काशीनाथ बागल,विलास बागल, संभाजी बागल,माधवराव बागल , शिवाजी काकडे, रघुनाथ चव्हाण, अविनाश बागल,यांच्या सह गावकरी उपस्थित होते. 1आक्टोबर रोजी गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे ,यानंतर होम हवन नंतर महोत्सव सांगता होणार.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button