नांदेड। मल्हारी म्हाळसाकात खंडोबा यात्रा माळेगाव ता. लोहा येथील दि. २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी प्रत्यक्ष माळेगाव येथे भेट देऊन माळेगाव यात्रा करीता आरोग्य विभागा मार्फत करण्यात येणारी भाविकांना आरोग्य विषयक सेवा व सुविधा उपलब्ध व्हावी.
यासाठी लोहा तालुक्यातील माळेगाव येथे जिल्हा स्तरावरील अधिकारी सह आज भेट दिली व त्या ठिकाणी प्रत्यक्ष यात्रा मध्ये भारतातुन येणारे लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा झाला पाहिजे या साठी स्वता डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची स्तोत्र याची पाहणी केली. सर्व स्तोत्राचे चंगल्या प्रतिचे व आय एस ओ मार्क बिल्चिग पावडर द्वारे प्रमाणात त्या ठिकाणी किती पावडर टाकून शुद्धीकरण कसे करायचे सांगितले. स्तोत्र ची स्वता ओ.टी .करून पाणी पिण्यासाठी योग्य आहे कि अयोग्य आहे याची खात्री डॉ संगिता देशमुख यांनी केली आहे. तसेच सार्वजनिक पाणी पुरवठा योजना टाकी, बोरवेल, यात्रेतील विहीरी, याचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवून अहवाल नुसार कार्यवाही करावी निर्देश दिले.
माळेगाव यात्रे करिता मनुष्य बळ याची नियुक्ती करण्यात आली असून यात्रेत विविध टिम तयार करण्यात आले आहे या मध्ये इमरजन्सी मेंडीकल सेवा, रुग्ण वाहीका १०२,१०८,व मोबाइल टिम नियुक्त केले आहे . तालुका समन्वय अधिकारी म्हणून सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सुर्यवंशी व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ शिवशक्ती पवार व साथरोग अधिकारी डॉ अन्सारी व तालुका नोडल अधिकारी डॉ.जे.टी.काबळे यांची नेमणूक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी केली आहे.
माळेगाव यात्रा रुग्ण सेवा ठिकाणी मुख्य ओ पी डी आयुर्वेदिक दवाखाना माळेगाव या ठिकाणी बाहय व आंतररुग्ण सेवा. उपकेंद्र माळेगाव बाहय रुग्ण व प्रसृती सेवा उपलब्ध केली आहे, बाहय रुग्ण सेवा उपलब्ध उपकेंद्र,पोलीस चौकी, मंदीर परिसर, पशुपरर्दशन ठिकाणी, आरोग्य प्ररदशनी माळेगाव इत्यादी ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
आरोग्य विषयक सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माळेगाव यात्रे जिल्हा मधील अनेक वैद्यकीय अधिकारी १३ समुदाय आरोग्य अधिकारी २० औषधी निर्माण अधिकारी ५ आरोग्य सहायक १०आरोग्य सेवक २७ आरोग्य सेविका २० ,१०२ चालकासह रुग्णवाहीका ६, १०८ वाहन चालक सह ३ , मोबाइल टिम ५ असे एकूण मनुष्य बळ ११५ नियुक्त डॉ संगिता देशमुख यांनी केले आहे. तसेच राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कंटेनर सर्वेक्षण व फोगीग करण्यात येणार आहे.
माळेगाव यात्रा निमित्ताने यात्रे पुर्वीचे आठ दिवस अगोदर व यात्रे नंतर आठ दिवस साथीचे आजार उदभवणार नये म्हणून आज माळेगाव यात्रा पूर्व तयारी मिटींग मध्ये उपस्थित विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन व सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी दिल्या. या वेळी सोबत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सुर्यवंशी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ शिवशक्ती पवार, साथरोग अधिकारी डॉ अन्सारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. टी. कांबळे, वैद्यकीय अधिकारी व स्थानिक पातळीवर काम करणारे विविध यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.