हदगाव, शेख चांदपाशा| नादेड परिक्षेञाचे विशेष उपपोलिस महानिरक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंद्याबाबतीत जिल्ह्यात कडक भूमिका घेऊन हदगाव पोलिस स्टेशनला चांगलेच फैलावर घेतल्याने हदगाव शहरासह तालुक्यात वरली मटक्याच्या बुक्कीवर धाडी टाकून काही रक्कमेसह काहीजणांना ताब्यात घेतल्याची माहीती आहे.
सदर कार्यवाही हदगाव पोलिस स्टेशन व नादेडच्या एलसीबी पथकाने सयुक्तरित्या केल्याची माहीती मिळाली. अशी सयुक्त कार्यवाही अवैध दारु व गौण खनिजच्या बाबतीत उत्पादन शुल्क विभाग व महसुल विभाग करण्यासाठी पुढकार का..? घेत नाहीत असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. वरिष्ठ अधिका-यानी दखल घेतल्यानंतरच स्थानिय प्रशान जाग होत यावरुन हदगाव तालुक्याच्या प्रशासनाची कार्यशैली दिसुन येत आहे.
या बाबतीत मिळालेल्या माहीती नुसार हदगाव शहरात तालुक्यात परवाच्या दिवशी पोलिसांनी अवैध मटका बुक्कीवर सयुक्तरित्या टाकलेल्या धाडीत 10 हजार पेक्षा कमी रक्कम मिळल्याची माहीती आहे. काही दिवसापुर्वी एका पोलिस मिञाने काही पोलिस अधिका-याच्या व्हाँटसअपवर शहरातील व तालुक्यातील आवैध धद्याबाबतीत माहीती दिली होती. परंतु या बाबतीत पोलिस प्रशासनाने ती माहीती गार्भियाने न घेतल्यामुळे हीच माहीती एका माध्यामात ठळक स्वरुपात प्रकाशित झाली.
त्याची दखल नादेड परिक्षेञाचे विशेष पोलिस महानिरक्षक व पोलिस अधिक्षक यांनी घेतल्याने हदगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरक्षक खडबडून जागे झाले. सोबतीला एलसीबीचे पथक घेवून मटका बुक्कीवर धाडी टाकल्या. परंतु ही कारवाई करित असतांना इतर अवैध दारु शहरातुन सप्लाय होते तसेच गुटखा व गौणखनिज बाबतीत ही अशी कार्यवाही होणे अपेक्षित असल्याची भावना सर्वसामान्य जनते आहे. पोलिस अधिका-याच्या व्हाट्सअपवर हदगाव शहरात व तालुक्यात चालणा-या अवैध धंद्या बाबतीत इत्यभूंत माहीती देणा-या त्या ‘पोलिस मिञाची ‘माञ जोरदार चर्चा होतांना दिसुन येत आहे.