नांदेड| दिव्यांगांना जीवन जगण्याचे बळ मिळावं त्यांना आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध निधीचा खासदार आमदारांना खर्च करण्याचा अधिकार दिला असतो प्रत्येक खासदाराला व आमदाराला दिव्यांगांवर निधी खर्च करण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु हाच निधी खासदार आमदार दिव्यांगांसाठी खर्च करत नसल्यामुळे तसेच सभागृहात, अधिवेशनात कुठलेच दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्रच्या वतीने चौथ्या टप्प्यातील आंदोलन आज रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार प्रा.रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर अर्ध नग्न अवस्थेत भिक मागून आंदोलन करण्यात आले.

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक १५ जुन २०२५ पासुन टप्याटप्याने नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात गनिमीकाव्याने आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज चौथ्या टप्प्यातील आंदोलन राज्यसभेचे खासदार डॉ.अजित गोपछडे, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर सकल दिव्यांगांनी अर्ध नग्न अवस्थेत भिक मागो आंदोलन केले.

आजच्या या आंदोलनात खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आंदोलन कर्ते दिव्यांगांची भेट घेऊन जवळपास दोन तास सविस्तर चर्चा केली आणि निवेदनातील सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दिव्यांगांचा मोर्चा थेट खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर निघाला असता चव्हाण हे दिल्लीला असल्यामुळे त्यांनी त्यांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी पाठविले आणि निवेदन स्विकारले त्यानंतर सकल दिव्यांग संघटनेच्या आक्रोश मोर्चा थेट लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवास स्थानावर धडकला असता चिखलीकरांचे स्विस सहाय्यकांनी आमदार साहेब वाढदिवसानिम्मीत अभिष्टचिंतन सोहळ्याला बाहेर गावी गेलेले असल्याचे म्हणत सकल दिव्यांगांनी आपला रोष व्यक्त करत वाढदिवसावर लाखों रूपये खर्च करण्यासाठी आहेत पण आम्हा दिव्यांगांसाठि का नाहित म्हणत तासभर ठिय्या आंदोलन केले.


तासभर सविस्तर चर्चा झाल्यानंतर स्विस सहाय्यकांनी आमदार महोदयांशी फोनवर चर्चा करून उद्याच्या उद्याच आमदार निधीतील दिव्यांगांचा ३० लक्ष रूपये निधी खर्च करण्याचे पत्र देणार असल्याचे आश्वासन दिले त्यानंतर सविस्तर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आक्रमक झालेल्या सकल दिव्यांगांनी आपल्या आजच्या चौथ्या टप्प्यातील आंदोलन थांबवीले आणि पुढील पाचव्या टप्प्यातील आमदार खासदार यांच्या घरावरील आंदोलनाची रूपरेषा आखली. या आंदोलनात जिल्ह्यातील सकल दिव्यांग बांधव भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते .

खासदार आमदारांनी आमच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करावा, दिव्यांगांचे प्रश्न राज्यसभेत, लोकसभेत, विधानसभेत मांडावे, अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न लक्षवेधीमध्ये मांडावे, दिव्यांगांना जगण्याचं बळ द्यावे अशा घोषणा देत सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे,चंपतराव डाकोरे आदित्य पाटील,रवि कोकरे,शिवाजी सुर्यवंशी, सय्यद आतिक हुसेन,व्यंकट कदम, शिवराज बंगरवार,माधव हिवराळे, प्रकाश वाघमारे, नागनाथ कामजळगे, विष्णु जायभाये,शेख आलीम, भोजराज शिंदे, सय्यद अफरोज, गोपाल मुंगीकर, नागेश रेंगुटवार, सुनिल कांबळे, मोहम्मद मोहसिन कादरी,प्रेमकुमार वैद्य, शेषेराव वाघमारे, शेख रियाज, कार्तिक कुमार भरतिपुरम, प्रशांत हणमंते,शेख गौस, किरणकुमार न्यालापल्ली, सईद वैद्य, लतिफ देसाई, अजय गोरे.शेख सादिक, संतोष वटमवार, राजेश फरकंडे,शेख सुफियान, संतोष रत्नपारखे.शेख माजीद, संतोष रामशेटवार,शेख मतीन,शेख रहिम,राजु इराबत्तीन, थोरकर, गोविंद बोदेवाड,जाफर पठाण,नागेश निरडी, धर्मेंद्र नालटे, विठ्ठल जाधव, बळीरामपुर दिव्यांग मंडळ,अफरोजा खानम, भाग्यश्री नागेश्वर,शेख जैनाज, कल्पना सकते मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांसह हजारो दिव्यांग बांधव आणि भगिनी यावेळी सहभागी झाले होते.
मी दिव्यांगांसाठी आजच 30 लक्ष रूपयांचा निधी खर्च करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेश देत असून जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील व राज्यातील बोगस दिव्यांगांची चौकशी करण्यासाठी केंद्रातील दिव्यांग मंत्र्यांना पत्र देऊन बोगस दिव्यांगांना शोधून काढणार व खऱ्या दिव्यांगांसाठी शासनाचा लाभ मिळवून देणार. दिव्यांग संघटनेच्या वतीने आजच दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांनी मला दिली आहे. त्यामुळे मी आजच दिव्यांगांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सहमत असून, माझ्यापासूनच मी आज दिव्यांगांना जगण्याचं बळ देऊन तीस लक्ष रूपये निधी दिव्यांगांना देणार,एसटी महामंडळ व रेल्वे विभागातील दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडवून बोगस दिव्यांग शोधून कारवाई करणार, तसेच शासनाच्या विविध विभागामध्ये दिव्यांगांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आणि हिमोफेलीयासह मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांचे प्रश्न सुद्धा सोडविणार असल्याचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले आहे. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणा-यांना कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक असा इशारा डॉ.गोपछडे यांनी दिला आहे.
खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी राज्य शासनाप्रमाणेच केंद्र सरकारला संजय गांधी निराधार अनुदान योजना मानधनात २५०० रूपये वाढ करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे त्यामुळे हि वाढ झाली तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगांना दरमहा 5 हजार रुपये मानधन मिळेल.

