नांदेडकरियर

Nanded ; श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NEP कनेक्ट) अंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट)-२०२५ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक २६जुनं२५ रोजी सकाळी १० वाजता, कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड,नांदेड येथे करण्यात आले आहे.

या आयोजित कार्यक्रमाला राहुल कर्डिले (भा. प्र. से.), जिल्हाधिकारी, नांदेड, डी.पी.सावंत,माजी राज्यमंत्री,उच्च्चतंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य,भार्गव ,संचालक,भार्गव करीअर अकॅडेमी, नांदेड, डॉ.मनेश कोकरे, संचालक,श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमा अंतर्गत १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे हे या एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

अभियांत्रिकी शिक्षणातील विविध संधीची कल्पना आणि वेगाने होत असलेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना फायदा होऊन त्यांचे भविष्य कसे उज्वल होईल या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या विविध संधीबद्दलची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावरील सविस्तर माहिती तसेच तंत्रशिक्षण संचालनाल याच्या अधिनस्त असलेले विविध पदवी अभ्यासक्रम, त्यांना प्रवेश घेतांना लागणारी पात्रता, प्रवेश नियमावली,ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, अर्ज भरण्याची प्रक्रिया,प्रक्रियेचा साधारण कालावधी, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती देण्यात येणार आहे. याला अनुसरून प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्ज निश्चिती करणे,गुणवत्ता यादी मधील त्रुटी दुरुस्त करणे,अंतिम गुणवत्ता यादी तपासणे, विकल्प सादर करणे,कॅप जागावाटप, जागास्वीकृती करणे,जागावाटप केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे इत्यादी पदवी प्रवेश प्रक्रियेशी संबंधीत बाबींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

यासोबतच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या विषयी माहिती देऊन अभियांत्रिकी शिक्षण कमी खर्चात पूर्ण करून रोजगारक्षम तसेच उद्यमशील उद्योजक कसे बनता येईल आणि placement संबंधी विस्तृत माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येईल. अभियांत्रिकी प्रवेश इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये योग्य अभ्यासक्रमाची निवड, उपलब्ध रोजगार व नविन उद्योग सुरु करण्याच्या संधी,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,या विषयी जागरूकता निर्माण करणे हा स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचा उद्देश आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button