देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मोजे कावळगडा येथील ग्राम सेविका नीता माने यांच्या भ्रष्टाचार जातीयवादी गटबाजी व एकाधिकार शाही कारोभाराच्या विरोधात ग्रामपंचायत मधील चार सदस्यांनी बऺड पुकारले असुन त्यानी थेट सदस्य पदाचे राजीनामे गटविकास अधिकार याकडे सादर केले आहेत.


ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जाधव पाटील (शिवसेना शाखा प्रमुख) विना जाधव, शोभा गायकवाड, गौतम बालेमारे या दोघांनी आपले सदस्य पद सोडत ग्राम सेविका नीता माने यांच्या विरुद्ध देगलूर पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सरपंच प्रतिनिधी आकाश गजले आणि ग्रामस्थ योगेश पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी असून, माने यांची बदली रद्द करून त्याची नियुक्ती त्वरीत अन्य ठिकाणी करावी.

तसेच त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपीची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्यच्या आरोपानुसार ग्राम सेविका नीता माने यांनी मागील काळात राजकीय गटाच्या मदतीने गावात शातते ऐवजीं तेढ निर्माण केली असून, बनावट विकास कामे दाखवून अंदाजे बारा ते पंधरा लाख रुपयांची आर्थिक भ्रष्टाचार केला आहे याप्रकरणी अनेकदा तक्रारी करून ही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या आंदोलनाला शिवसेना (उध्धव बाळासाहेब ठाकरे गट) याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील शहर प्रमुख संजय जोशी शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर यांनी आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिले आहे.
