Degalur ; कावळगडयात ग्राम सेविका विरोधात ग्रामपंचायत सदस्याचे देगलूर मध्ये आमरण उपोषण
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मोजे कावळगडा येथील ग्राम सेविका नीता माने यांच्या भ्रष्टाचार जातीयवादी गटबाजी व एकाधिकार शाही कारोभाराच्या विरोधात ग्रामपंचायत मधील चार सदस्यांनी बऺड पुकारले असुन त्यानी थेट सदस्य पदाचे राजीनामे गटविकास अधिकार याकडे सादर केले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जाधव पाटील (शिवसेना शाखा प्रमुख) विना जाधव, शोभा गायकवाड, गौतम बालेमारे या दोघांनी आपले सदस्य पद सोडत ग्राम सेविका नीता माने यांच्या विरुद्ध देगलूर पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सरपंच प्रतिनिधी आकाश गजले आणि ग्रामस्थ योगेश पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी असून, माने यांची बदली रद्द करून त्याची नियुक्ती त्वरीत अन्य ठिकाणी करावी.
तसेच त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपीची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्यच्या आरोपानुसार...
