नांदेड l छत्रपती संभाजीनगर येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये राज्यभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात नांदेड येथील शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेला विशेष गौरव प्राप्त झाला. या प्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शाळेचे अध्यक्ष गिरीश जाधव व प्राचार्य सदाशिव टाकळे यांना सन्मानित करण्यात आले.


शाकुंतल स्कूलने अल्पावधीतच नांदेड जिल्ह्यात तसेच संपूर्ण मराठवाड्यात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे लौकिक मिळवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सृजनशील अध्यापन पद्धती, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यश, तसेच सामाजिक बांधिलकी


जपत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणे या सर्व बाबींचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.


या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष गिरीश जाधव म्हणाले की, हा पुरस्कार केवळ आमच्या संस्थेचा नाही तर प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद यांच्या मेहनतीचा सन्मान आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाटचाल आम्ही अधिक जोमाने पुढे नेऊ. या गौरवामुळे शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सच्या पुढील वाटचालीला नवी प्रेरणा व ऊर्जा लाभणार आहे. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक जाधव, सचिव सौ. सिंधुताई पावडे, सहसचिव शिवकुमार बुके, कोशाध्यक्षा कु. पूजा जाधव, उपप्राचार्या भुवना बार्शीकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून अभिनंदन केले.



