‘Shakuntal’ ; राज्यपाल बागडे यांच्या हस्ते ‘शाकुंतल’चे गिरीश जाधव यांचा गौरव
नांदेड l छत्रपती संभाजीनगर येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये राज्यभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात नांदेड येथील शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेला विशेष गौरव प्राप्त झाला. या प्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शाळेचे अध्यक्ष गिरीश जाधव व प्राचार्य सदाशिव टाकळे यांना सन्मानित करण्यात आले.
शाकुंतल स्कूलने अल्पावधीतच नांदेड जिल्ह्यात तसेच संपूर्ण मराठवाड्यात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे लौकिक मिळवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सृजनशील अध्यापन पद्धती, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यश, तसेच सामाजिक बांधिलकी
जपत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणे या सर्व बाबींचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष गिरीश ज...
