नांदेड

Balaji Ambore Elected । प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उपमहानगर प्रमुख पदी बालाजी अंबोरे यांची निवड -NNL

नांदेड। निराधार दिव्यांगाचे हृदय सम्राट मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने नांदेड जिल्हा कार्यकारणी मजबूत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतपाल सिंग साहू यांनी सामाजिक कार्यकर्ते बालाजी अंबोरे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उप महानगर पदी नियुक्ती करून पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.

दिनांक 16 जुलै रोजी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे त्यांचे दिनांक 9 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या परिवारासह जिल्हाभरातील दिव्यांगांमध्ये शोककळा पसरली या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेतील प्रहार संघटनेच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजलीपर कार्यक्रमांमध्ये नांदेड जिल्ह्यातील काही तालुकाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा परिषद येथील प्रहार संघटनेच्या कार्यालयामध्ये कंधार,लोहा,देगलूर आणि धर्माबाद तालुका प्रमुखांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख आणि महानगरप्रमुख प्रीतपाल सिंग साहू यांनी निवडीचे नियुक्तीपत्र देऊन पुढील जबाबदारी सोपवण्यात आली.

निवडीनंतर बोलताना बालाजी आंबोरे म्हणाले की, मला सामाजिक कार्यामध्ये रंजले गांजले यांच्या उत्थानासाठी, दिव्यांगासाठी मनातून कार्य करण्याची आस्था आहे. गेल्या अनेक दिवसापासून मी पीडित,शोषित,दिव्यांग, यांच्यासाठी काम करीत आहे. माझ्या कार्याचा आढावा घेऊन जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख साहेब आणि नांदेड महानगराध्यक्ष प्रीतपाल सिंग शाहू यांनी बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने मला नांदेड उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्त करून पुढील काम करण्याची जबाबदारी सोपवली. मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यात अविरत प्रयत्नशील राहून पक्षाला बळकटी देण्याचे काम करीत राहील असे म्हणाले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button